माजी केंद्रीय मंत्री पी.आर. कुमारमंगलम यांच्या पत्नीची हत्या

Former Union minister PR Kumarmangalam's wife Kitty murdered in Delhi residence
माजी केंद्रीय मंत्री पी.आर. कुमारमंगलम यांच्या पत्नीची हत्या

दिवंगत माजी केंद्रीय मंत्री पी. रंगराजन कुमारमंगलम यांच्या पत्नीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीतील वसंत विहारमधील राहत्या घरी ६७ वर्षीय त्यांच्या पत्नी किटी मंगलम यांची उशीरने तोंड दाबून हत्या करण्यात आली. घरातील धोबी आणि त्याच्या दोन साथीदारांवर हत्येचा आरोप करण्यात आला आहे. यातील आरोपी धोबी राजूला पोलिसांनी अटक केली असून अन्य दोघांचा शोध सुरु आहे.

माजी केंद्रीय मंत्री पी.आर.कुमारमंगलम यांच्या घरातील धोबी काम करणारा राजू याने चोरीच्या उद्देशाने त्यांच्या पत्नीची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. वसंत विहार भागातील इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर त्या राहत होत्या. या घटेनेच्या वेळी किटी कुमारमंगलम आणि त्यांची घरात काम करणारी मोलकरीण या दोघीच होत्या. मंगळवारी सकाळी ९ च्या सुमारास ही घटना घडली.

या घटनेच्या आधी दरवाजी बेल वाजवून धोबी घरात आला, त्याच्या पाठोपाठ त्याचे दोन अन्य साथीदार देखील घरात जबरदस्ती शिरले. त्यानंतर आरोपींनी मोलकरणीला पकडून ओढत एका खोलीत बंद केले आणि बांधून ठेवले. त्यानंतर घरात दरोडा टाकत किटी कुमारमंगलम यांची उशीने तोंड दाबून हत्या करण्यात आली.

परंतु रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही माहिती पोलिसांनी मिळाली. मोलकरणीने स्वत:ला कसेबसे सोडवून घेतले आणि आरडाओरडा केला. यानंतर आजूबाजूच्या परिसरात सर्व घटनेची माहिती मिळाली. मोलकरणीच्या माहितीनुसार, आरोपी धोबीचे नाव राजू असे असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. तर त्याच्या दोन साथीदारांचा पोलिस शोध घेत आहेत.

सुप्रीम कोर्टातील वकील  किटी कुमारमंगलम

पी.आर. कुमारमंगलम हे पीव्ही नरसिंहराव सरकारमध्ये केंद्रीय मंत्री होते. नंतर ते भाजपमध्ये दाखल झाले. वाजपेयी सरकारच्या काळात त्यांनी केंद्रीय ऊर्जामंत्री पदाचा पदभार स्वीकारला. मात्र कर्करोगाने त्यांचे निधन झाले. तर त्यांच्या पत्नी किटी कुमारमंगलम यांनी सुप्रीम कोर्टात वकील म्हणूनही काम केलं आहे. त्यांचा मुलगा काँग्रेस नेता आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तो बंगळुरुहून दिल्लीला आला.