‘हा’ क्रिकेटपटू म्हणतो विराट कोहली झाला म्हातारा

‘हा’ क्रिकेटपटू म्हणतो विराट कोहली झाला म्हातारा

'हा' क्रिकेटपटू म्हणतो विराट कोहली झाला म्हातारा

कोरोना व्हायरसमुळे सध्या बॉलिवूड कलाकारांसह क्रिकेटर देखील आपआपल्या घरात बंद आहेत. पण, सोशल मीडियावर मात्र, बॉलिवूड कलाकारांसह क्रिकेटर चांगलेच अॅक्टिव झाले आहेत. अशा परिस्थितीमध्ये कित्येक जण सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली देखील मागे नाही. विराट नवनवीन व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असतो. त्यातच आता विराटने पुस्तक वाचतानाचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. मात्र, या फोटोमुळे विराट म्हातारा झाला असल्याचा शाब्दिक हल्ला एका क्रिकेटपटूने केल्याचे समोर आले आहे.

कोरोना व्हायरसमुळे सध्याच्या घडीला क्रिकेट सामने बंद झाले आहेत. त्यामुळे क्रिकेटपटू गेल्या मार्च महिन्यापासून मैदानात खेळताना दिसत नाहीत. त्यामुळे त्यांचे फिटनेसकडे देखील दुर्लक्ष झाले आहे. त्याचप्रमाणे ते पूर्वीसारखा व्यायाम करताना देखील दिसत नाही.

दरम्यान, कोहलीने आजही एक सोशल मीडियावर फोटो पोस्ट केला आहे. त्यामध्ये विराट पुस्तक वाचताना दिसत आहे. या फोटोच्या खाली एक कॅप्शन देखील लिहिण्यात आली आहे. यामध्ये विराट म्हणाला आहे की, ‘मी सध्या मुंबईत आहे आणि मुंबईतला मान्सूचा आनंद घेत आहे. यापेक्षा चांगळा वेळ वाचनासाठी मिळणार नाही’.

हा क्रिकेटपटू काय म्हणाला बघा

विराटच्या या पोस्टवर ऑस्ट्रेलियाचा सलमीवीर डेव्हिड वॉर्नरने एक कमेंट केली आहे. वॉर्नरचे लक्ष या फोटोमधील विराटच्या पांढऱ्या दाढीकडे गेले आहे. त्याने त्यावर एक कमेंट केली आहे. वॉर्नरने म्हटले आहे की, ‘माझ्या युवा मित्राच्या दाढीत काही पांढरे केसही पाहायला मिळत आहे. त्यामुळे कोहली म्हातारा झाला आहे. या कमेंटनंतर वॉर्नरने काही इमोजींचाही वापर केला आहे. वॉर्नरची ही कमेंट चांगली व्हायरल झालेली पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर चाहत्यांनीही वॉर्नरच्या कमेंटवर आपले मत व्यक्त केले आहे.


हेही वाचा – भारताने जिंकलेली २०११ ची वर्ल्डकप फायनल फिक्स्ड होती, श्रीलंकन माजी मंत्र्याचा दावा!


 

First Published on: June 18, 2020 11:21 PM
Exit mobile version