मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ते बारवी डॅमच्या दिशेने निघाले आणि वाटेतच

मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ते बारवी डॅमच्या दिशेने निघाले आणि वाटेतच

भिवंडी: मित्राचा वाढदिवस बेतला जीवावर!

कॉलेज मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी अन्य मित्रांसोबत दुचाकीवरुन जात असताना एका धोकादायक वळणावर अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात कॉलेज युवकाचा मृत्यू झाल्याची झाला असून त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्दैवी घटना मुरबाड रोडवरील जांभुळपाडा येथे घडली आहे.

आदित्य संतोष भोईर (१७ रा.पिंपळघर ,ता.भिवंडी) असे दुचाकीच्या अपघातात मृत्यू झालेल्या कॉलेज युवकाचे नाव आहे. मित्राचा वाढदिवस जीवावर बेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तो कल्याण येथील बालक विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालयात १२ वीच्या वर्गात शिकत होता. त्याच्या एका मित्राचा वाढदिवस असल्याने तो साजरा करण्यासाठी आदित्य अन्य दहा मित्रांसोबत दुचाकींवरुन बारवी डॅम येथे चालला होता. मात्र भरधाव दुचाकी जांभुळपाडा येथे एका वळणावर घसरून ती थेट नाल्यात पडली. त्यामुळे दुचाकी नाल्यातील दगडांवर आदळल्याने आदित्य याच्या छातीला, डोक्याला दुखापत होऊन तो गंभीर जखमी झाला. त्याला बेशुद्ध अवस्थेत अन्य मित्रांनी उल्हासनगरच्या सेंट्रल रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या अपघाती मृत्यूची नोंद टिटवाळा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

First Published on: October 4, 2020 12:14 AM
Exit mobile version