IPL 2024 : आयपीएलमध्ये सट्टेबाजी, ठाण्यातील प्रकार उघडकीस; तिघांना अटक

IPL 2024 : आयपीएलमध्ये सट्टेबाजी, ठाण्यातील प्रकार उघडकीस; तिघांना अटक

बनावट अ‍ॅपद्वारे गडचिरोलीत आयपीएलवर सट्टेबाजी, चौघांना अटक

ठाणे : देशात लोकसभा निवडणुकीप्रमाणेच आयपीएलची रणधुमाळी सुरू आहे. महिन्याभरापासून सुरू असलेल्या आयपीएलच्या सामन्यांवर दररोज जोरदार सट्टा लावण्यात आला आहे. ठाण्यातही एका हॉटेलमध्ये आयपीएलच्या सामन्यांवर सट्टा लावण्यता येत होता. याबाबतची माहिती ठाणे पोलिसांना कळाल्यानंतर त्यांच्याकडून कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेले तिन्ही जण छत्तीसगडमधील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. (IPL 2024 match betting operation exposed in Thane)

मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील कोंगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल के.एन. पार्क, कोनगाव येथे आयपीएलवर सट्टेबाजी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी या प्रकरणी धडक कारवाई करत तिघांना ताब्यात घेतले. या प्रकरणात पोलिसांनी शानू ललित बेरीवाल(वय वर्षे 31), रजत बाबुला शर्मा(वय वर्षे 40) आणि विजय सीताराम देवगन (वय वर्षे 40) या तिघांना ताब्यात घेतले आहे. या तिन्ही सट्टेबाजांकडून पोलिसांनी 12 मोबाईल फोन, एक टॅब व एक लॅपटॉप असे एकूण एक लाख 97 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

हेही वाचा… Virar News: कारगिल नगरमधील चाळमाफियांनी पुन्हा डोके वर काढले

आयपीएलच्या सट्टेबाजी प्रकरणात पोलिसांनी कोंगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे, तर पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी ठाणे पोलिसांना दिलेल्या निर्देशानुसार, आयपीएल सुरू असल्याने हॉटेलमध्ये तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, ठाण्यातील विविध पथकांकडून कारवाया सुरू करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे ठाण्यातील विशेष कृती दल तसेच खंडणी विरोधी पथकास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.

गुरुवारी (ता. 25 एप्रिल) संध्याकाळी ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी या तिन्ही सट्टेबाजांना सट्टा लावताना रंगेहाथ पकडले. सदर सट्टेबाज आपापसांत संगनमत करून लॅपटॉपमध्ये ‘शुभलाभ’ नावाच्या सॉफ्टवेअरद्वारे क्रिकेट मॅचवर बेटिंग स्वीकारत होते, अशी गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये त्यांना सट्टेबाजांकडे असलेल्या मोबाईल आणि लॅपटॉपमधून सट्टा स्वीकारलेली माहिती आढळली. ज्यानंतर या तिघांना ताब्यात घेण्यात आले.

हेही वाचा… Crime News: विवाहित महिलेची आत्महत्या; पती आणि सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल

First Published on: April 27, 2024 10:14 AM
Exit mobile version