बिल्डर अविनाश भोसलेंची ईडीकडून १० तास चौकशी

बिल्डर अविनाश भोसलेंची ईडीकडून १० तास चौकशी

बिल्डर अविनाश भोसले

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर ईडीने छापा मारल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी ईडीने पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले यांची दहा तास कसून चौकशी केली. फेमा कायद्यांतर्गत अविनाश भोसले यांची चौकशी करण्यात आल्याचे सांगितले जाते.

पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक अविनाश भोसले यांना शुक्रवारी मुंबईतील ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. दुपारी ते स्वतः आपल्या मोटारीतून मुंबईतील ईडीच्याकार्यलयात हजर झाले होते. फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्ट(फेमा) कायद्याअंतर्गत १० तासांच्या चौकशीनंतर सायंकाळी त्यांना सोडून देण्यात आले आहे. अविनाश भोसले यांचा टॉप्स ग्रुप प्रकरणाशी काहीही संबंध नसून टॉप्स ग्रुपबाबत चौकशी ईडीच्या परिमंडळ-२ कडे सुरु असल्याची माहिती ईडीच्या एका वरिष्ठ अधिकारी यांनी दिली आहे.

या चौकशी दरम्यान ईडीने त्यांच्याकडील काही कागदपत्रांची छाननी सुरू केल्याचे समजते. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचे घर आणि कार्यालयावर ईडीने छापा मारला होता. टॉप्स ग्रुप संबंधी ही कारवाई ईडीने केल्याचे समजते. मात्र अविनाश भोसले यांच्यावरील कारवाईचा टॉप्स ग्रुपशी काही संबंध नसल्याचे ईडीच्या एका अधिकार्‍याने सांगितले.
फेमा कायद्यांतर्गत परकीय चलनाच्या नियमावलीचा भंग केल्याप्रकरणी अविनाश भोसले यांची चौकशी करण्यात आली. सुमारे दहा तासानंतर अविनाश भोसले हे ईडीच्या कार्यालयातून बाहेर आले. त्यानंतर स्वत:च्या कारमधून निघून गेले. मात्र त्यांनी मिडियाशी बोलणे टाळले.

First Published on: November 28, 2020 7:10 AM
Exit mobile version