छत्तीसगडमधील नक्षलवादी हल्ला; महाराष्ट्राच्या जवानाला वीरमरण, CRFचे ७ जवान जखमी

छत्तीसगडमधील नक्षलवादी हल्ला; महाराष्ट्राच्या जवानाला वीरमरण, CRFचे ७ जवान जखमी

छत्तीसगडमधील नक्षलवादी हल्ला

श्रीनगरमधील HMT भागात सुरक्षा दलावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या भ्याड हल्ल्यात दोन जवान शहीद झाल्याची घटना ताजी असताना आज छत्तीसगडमध्ये पुन्हा एकदा नक्षलवादी हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात महाराष्ट्राचे जवान सीआरपीएफचे सहायक कमांडेंट नितीन भालेराव शहीद झाले असून सात जण जखमी झाले आहेत. तर यातील काही जवानांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समोर आले आहे.

नेमके काय घडले?

छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी सीआरपीएफ (केंद्रीय राखीव पोलीस दल) पुन्हा एकदा कोब्रा २०६ बटालियनच्या जवानांना लक्ष्य केले आहे. नक्षलवाद्यांनी केलेल्या आयईडी स्फोटात सात जवान जखमी झाले आहेत. तर नाशिक जिल्ह्यातील रहिवासी नितीन भालेराव शहीद झाले आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार; रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हे सर्व जवान एक ऑपरेशन पूर्ण करुन येत असताना नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या वाहनास लक्ष्य केले. त्यानंतर त्यांनी आयईडी स्फोट घडवून आणला ज्यामध्ये अनेक जवान जखमी झाले. जखमी झालेल्या जवानांना तात्काळ हेलिकॉप्टरने रायपूर येथे आणण्यात आले आहे. नक्षलवाद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सुरक्षा दलांनी बुर्कापाल, तेमलवाडा आणि चिंतागुफामध्ये संयुक्त कारवाई सुरू केली आहे.

सीआरपीएफच्या २०६ कोब्रा बटालियनच्या सैन्याला गस्त करण्यासाठी जवानांना पाठविण्यात आले होते. दरम्यान, जवान परत येत असताना सायंकाळी उशिरा तारमेटला जवळ नक्षलवाद्यांनी सुरुंग स्फोट (IED) घडवून आणला. ज्यामध्ये जवान गंभीररित्या जखमी झाले आणि रायपूरला येईपर्यंत सहायक कमांडेंटचा मृत्यू झाला. – सुंदरराज पी, पोलीस महानिरीक्षक; बस्तर जिल्हा


हेही वाचा – Video: नदीवर पाण्याऐवजी विषारी फेसाची लाट


 

First Published on: November 29, 2020 10:50 AM
Exit mobile version