Lok Sabha 2024 : 10 वर्षांपूर्वीचे जुमले, आता गॅरेंटी नावने आणले; आदित्य ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल

Lok Sabha 2024 : 10 वर्षांपूर्वीचे जुमले, आता गॅरेंटी नावने आणले; आदित्य ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल

कोल्हापूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांची आज (28 एप्रिल) महविकास आघाडीचे लोकसभेचे कोल्हापूरचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती आणि हातकणंगले लोकसभेचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्या प्रचारार्थ कोल्हापुरात आणि हातकणंगले येथे सभा पार पडली. यावेळी सभेत भाष्य करताना उपस्थित जनतेने दिलेला उदंड प्रतिसाद आणि उत्साह पाहून विजयाची खात्री असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच, ‘लोकसभेची निवडणूक महाराष्ट्रात एक नवी चळवळ निर्माण करणारी आहे. ह्या चळवळीतून निर्माण होणारी ऊर्जा आणि आपल्या महाराष्ट्राची माती दिल्लीचा तख्त काबीज केल्याशिवाय राहणार नाही’, हा विश्वास उपस्थितांना आदित्य ठाकरेंनी दिला. (Lok Sabha Election 2024 Shiv sena thackeray group leader aaditya thackeray slams pm narendra modi in kolhapur)

शाहू महाराजांविरोधात भाजप गद्दाराला उभं करेल असं वाटत नव्हतं

कोल्हापूरातील सभेत भाष्य करताना आदित्य ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. “शाहू महाराज उमेदवार म्हणून उभे राहिल्यानंतर समोर कुणी उभ रहायला नको होतं, या घराण्याचं आणि माझ्या घराण्याचं वेगळं नातं आहे. राजर्षी शाहू महाराज आणि प्रबोधनकार ठाकरे यांचे चांगले संबंध होते. देशाच्या हितासाठी आम्ही महाविकास आघाडी निर्माण केली होती . 2019 साली बंटी साहेब यांनी मला सांगितलं होतं आदित्य काळजी करू नको आमचं ठरलंय. शाहू महाराज यांच्या विरोधात भाजप एका गद्दाराला उभा करतील असं वाटतं नव्हतं”, अशा शब्दांत आदित्य ठाकरेंनी टीका केली.

हेही वाचा – LOK SABHA 2024 : रोज टोप घालताना विचार करावा लागतो आज कोणत्या पक्षात; उद्धव ठाकरेंची राणेंवर टीका

10 वर्षांपूर्वीचे जुमले, आता ‘गॅरेंटी’ नावने आणले

मोदी सरकारच्या घोषणांवर आदित्य ठाकरे यांनी सडकून टीका करताना म्हंटले की ‘भाजपच्या 400 पारचं आता तडीपार होणार . दहा वर्षे हे सरकार एका व्यक्तीचे एका पक्षाचे होतं. जनतेने फक्त मन की बात ऐकायचं, पण जनतेच कधी ऐकलंय का? 10 वर्षांपूर्वी जे जुमले होते त्याचे नाव आता केवळ गॅरेंटी हे दिलंय. पण भाजपला जेमतेम 200 पर्यंत जागा येतील. 10 वर्षे मनात होते तशी सत्ता गाजवली. पण मटण, चिकन, मासे खायचे बंद करणारे सरकार चालणार आहे का? 100 स्मार्ट सिटी होणार होत्या 1 तरी सिटी तयार झाली का? भाजपने 10 वर्षे सत्ता भोगली आणि आम्हाला विचारतात तुम्ही काय केलं. काल फडणवीस म्हणाले कोरोना लस मोदींनी बनवली पण ही लस महाराष्ट्रात तयार झाली, आपल्या पुण्यात झाली. केंद्राने सांगितलं की तुम्ही लसीला हात लावू नका ही आमच्या पद्धतीने लस देणार. महाराष्ट्रात नाही तर देशात कुणाला हे सरकार आपलं वाटतं नाही. चीन विरोधात वापरायला पाहिजे होतं ते सैन्य दिल्लीत शेतकऱ्यांवर वापरले. एकही भूल कमल का फुल असा प्रतिसाद नागरिक आता देतात. असं म्हणत एक मन की बात नहीं होगी सबके मन की बात होगी”, असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी सरकारला दिला.


हेही वाचा – Aaditya Thackeray : बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्याची त्यांची लायकी नाही; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

Edited By – Vaibhav Patil

First Published on: April 28, 2024 11:07 PM
Exit mobile version