रायगड जिल्ह्यात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम राबविणार – सुभाष देसाई

रायगड जिल्ह्यात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम राबविणार – सुभाष देसाई

रायगड जिल्ह्यात लवकरच स्वयंरोजगार निर्मितीसाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम राबविणार, असल्याची घोषणा राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केली. तसेच शहरावर शिवसेनेचा भगवा फडकणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. येथे गुरुवारी आयोजित करण्यात आलेलया विधानसभा मतदारसंघ कार्यकर्ता मेळावा आणि जाहीर पक्ष प्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार महेंद्र दळवी, माजी जिल्हाप्रमुख विष्णू पाटील, संपर्कप्रमुख विलास चावरी, सल्लागार बबन पाटील, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका सचिव नामदेव पाटील यांच्यासह त्याच्या समर्थकांनी शिवसेनेत प्रवेश केला. कोरोना काळात जनतेचे कार्य करताना मुख्यमंत्री कुठेच डगमगले नाहीत आणि याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे सर्वोच्च न्यायालय, जागतिक आरोग्य संघटनेने धारावीसारख्या भागात कोरोनाचा फैलाव थांबविण्यात यश मिळविल्याबाबत राज्याचे कौतुक केले हे आहे. तर प्रसार माध्यमांच्या सर्व्हेमध्ये देखील देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना पसंती दिली गेल्याचा उल्लेख देसाई यांनी केला. राज्यातील सर्व भाषिक शाळांमध्ये मराठी भाषेचा विषय सक्तीचा करण्याचा कायदा करणारे एकमेव मुख्यमंत्री असल्याचे ते म्हणाले. येणार्‍या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिका निवडणुका या शिवसेनेसाठी अस्तित्त्वाची लढाई असून, सर्वांनी मतभेद दूर करून एकत्र येऊन काम करा. जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकविण्याची क्षमता आपल्यात असल्याचे दळवी यांनी सांगितले.


हे ही वाचा – टी-२० वर्ल्ड कपमध्ये पाकला मोठा झटका, हसन अलीला गोळी मारा..,पाकिस्तानी संतापले


 

First Published on: November 12, 2021 8:48 PM
Exit mobile version