घरक्रीडाटी-२० वर्ल्ड कपमध्ये पाकला मोठा झटका, हसन अलीला गोळी मारा..,पाकिस्तानी संतापले

टी-२० वर्ल्ड कपमध्ये पाकला मोठा झटका, हसन अलीला गोळी मारा..,पाकिस्तानी संतापले

Subscribe

टी-२० वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाची धडक

टी-२० वर्ल्ड कपच्या दुसऱ्या सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया संघाने पाकिस्तान संघाचा दारूण पराभव केला. पाकिस्तानचा ५ विकेटने पराभव करत दुसऱ्यांदा अंतिम सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाने आपली जागा बनवली. सामन्यामध्ये हसन अलीने मॅथ्यू वेडची कॅच सोडली. त्यानंतर लगातार तीन बॉलवर वेडने षटकार लगावला आणि सामन्याचं रंगरूपचं बदलून टाकलं. या कारणामुळे पाकिस्तानी चाहते संतापले असून हसन अली आणि त्याच्या पत्नीला प्रचंड ट्रोल केलं जात आहे.

हसनची पत्नी भारतीय आहे. हसनच्या शिया आणि त्याची भारतीय पत्नी सामियावर ट्रोलर्सने शिवीगाळ करत सोशल मीडियावर अनेक अपशब्द वापरले आहेत. हसनला पाकिस्तानमध्ये गद्दार असं बोललं जात आहे. काही ट्रोलर्सने हसन अलीला गोळी मारा, अशा प्रकारचं धक्कादायक ट्विट केलं आहे. हसनची पत्नी सामिया भारताच्या हरियाणा राज्यात राहते. ती अमीरात एयरलाईन्समध्ये एक फ्लाइट इंजिनीअर आहे. त्यांचे कुटुंब मागील १५ वर्षापासून फरीदाबादमध्ये राहत आहे.

- Advertisement -

१९ व्या ओव्हरमध्ये मोठा ड्रामा

सामन्यातील शेवटच्या १२ चेंडूवर ऑस्ट्रेलिया संघाला २२ धावांची आवश्यकता होती. १९ वी ओव्हर शाहीद अफरीदी करत होता. परंतु त्याच्या तिसऱ्या चेंडूवर मॅथ्यू वेडने एका मोठा शॉट लगावला. चेंडू हवेत होता आणि हसन अली कॅच घेण्यासाठी त्या चेंडूच्या मागे धावला. सर्व पाकिस्तानी चाहत्यांना आशा होती की, हसन ही कॅच पकडत सामन्याचा मार्ग मोकळा करेल, मात्र तसं झालं नाही. हसन अलीने हातातली कॅच सोडली आणि पाकचा मार्ग अजून कठीण झाला.

- Advertisement -


हेही वाचा: हे गेंड्याच्या कातडीचं सरकार असून यांना विलीनीकरण का नको? : नितेश राणेंचा सवाल


तिसऱ्या चेंडूवर मॅथ्यूला दुसऱ्यांदा जीवनदान मिळाल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाला ९ चेंडूत १८ धावांची आवश्यकता होती. परंतु पुढच्या तीन चेंडूत मॅथ्यूने हॅटट्रीक करत तीन षटकार लगावले. त्यामुळे पाकिस्तान संघावर मोठा आघात झाला आणि टी-२० वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने दुसऱ्यांदा धडक मारली. मॅथ्यूने १७ चेंडूमध्ये ४१ धावांची मजल मारत मॅन ऑफ द मॅच मिळवला.

दरम्यान, पाकिस्तानी संघावर ऑस्ट्रेलिया संघाने मात केल्यानंतर विजेतेपदासाठी हा संघ न्यूझीलंडच्या विरूद्ध लढणार आहे. या दोन्ही संघामध्ये येत्या रविवारी अतितटीचा सामना होणार आहे. त्यामुळे या दोन संघापैकी कोणता संघ बाजी मारणार? हे पाहणं क्रिकेट प्रेमींसाठी महत्वाचं ठरणार आहे.

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -