आयुष्यातील अडचणी संपतच नाहीयेत? मग वाचा नारळाचे तोडगे

आयुष्यातील अडचणी संपतच नाहीयेत? मग वाचा नारळाचे तोडगे

प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी येत-जात असतात. त्या अडचणींवर मात करण्याचे काम त्या संबंधित व्यक्तीच्या हातातच असते. मात्र या अडचणींवर मात करण्यासाठी नारळ देखील मदत करतो, हे तुम्हाला माहित आहे का? नारळाचे बरेच फायदे असताना त्यापैकी हा एक फायदा असतो. त्यामुळे नारळामुळे आयुष्यातील अडचणी कशा दूर करताना येईल हे वाचा…

आजारामुक्त होण्यासाठी…

मंगळवारी एक नारळ सव्वा मीटर लाल कपड्यात बांधा. त्यानंतर त्या व्यक्तीवरून सात वेळा उतरवा. तसेच ज्याला नजर लागली असेल त्याच्यावरून उतरवून तो हनुमानच्या चरणी ठेवा. असे केल्यामुळे कोणत्याही प्रकारची बाधा, नजर लागण्याचा प्रकार किंवा आजार दूर होईल.

धन प्राप्त होण्यासाठी आणि सुख-समृद्धी येण्यासाठी…

शुक्रवार हा वार लक्ष्मीचा मानला जातो. या दिवशी अंघोळ केल्यानंतर लाल वस्र परिधान करा आणि लक्ष्मीची पूजा करा. त्यानंतर एक चांगला नारळ लक्ष्मीला अर्पण करा आणि पूजेनंतर तो नारळ कोणत्याही स्वच्छ लाल रंगाच्या कपड्यात बांधून, घरातील अशा ठिकाणी ठेवा, ज्यावर कोणाची नजर जाणार नाही. असे केल्याने तुमच्या घरात धन प्राप्त होईल आणि सुख-समृद्धी येऊ लागले.

व्यापारातील नुकसान दूर करण्यासाठी..

गुरुवारच्या दिवशी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा करा. त्यानंतर पिवळ्या रंगाच्या एका कपड्यामध्ये पाणीवाला एक नारळ, धागा आणि एक पांढरा रंगाचा गोड पदार्थ ठेवून कोणत्याही मंदिरातील भगवान विष्णूला अर्पण करा. असे केल्याने व्यापारात होणारे नुकसान किंवा गुंतवणुकीमुळे होणारे नुकसान दूर होईल.

शनि दोष दूर करण्यासाठी अन् पैशाची बचत होण्यासाठी…

खूप प्रयत्न करून तुमच्या हातात पैसे राहत नसतील आणि मेहनत करूनही त्याचे फळ मिळत नसेल. तसेच शनिचा दोष असेल तर अशा समस्येत नारळ तुमची मदत करू शकतो. शनिवारच्या दिवशी शनि मंदिरात सात पाणीवाले नारळ अर्पण करा. मग हे सर्व नारळ कोणत्याही नदीत विसर्जित करा. हा उपाय केल्यामुळे शनि दोष दूर होईल आणि पैसे बचत होण्यास सुरुवात होईल.


हेही वाचा – जन्मदिवसावर अवलंबून असतो तुमचा स्वभाव


First Published on: December 15, 2021 8:38 PM
Exit mobile version