घरभक्तीजन्मदिवसावर अवलंबून असतो तुमचा स्वभाव

जन्मदिवसावर अवलंबून असतो तुमचा स्वभाव

Subscribe

हाताच्या पाच बोटाप्रमाणे माणसाचे स्वभावही सारखे नसून वेगवेगळे असतात. पण पौराणिक ग्रंथांनुसार तुमचा स्वभाव हा तुम्ही ज्या दिवशी जन्माला आलात त्यावर अवलंबून असतो. अनेक ज्योतिषी पुस्तकांमध्येही स्वभाव आणि जन्मदिवस यांचा दाट संबंध असल्याचा उल्लेख मिळतो.

रविवार- जर तुमचा जन्मदिवस हा रविवार असेल तर तुमच्या व्यक्तीमत्वावर सूर्याचा प्रभाव नक्कीच असतो. अशा व्यक्ती या निडर आणि तेवढ्याच उदार मनाच्या असतात. या व्यक्तींचा समावेश सामर्थ्यवान व्यक्तींमध्ये होतो.

- Advertisement -

सोमवार-सोमवारी जन्माला आलेल्या व्यक्तीवर चंद्राचा प्रभाव असतो. या व्यक्ती स्वभावाला शांत आणि अध्यात्मिक विचारांच्या असतात. गोड वाणी असते. स्वभावाने गंभीर आणि भावुक असतात.

मंगळवार-जर तुमचा जन्म मंगळवारी झाला असेल तर या व्यक्तींचा स्वभाव रागीट, हट्टी आणि नीडर पण न्यायप्रिय असतो. खोटं बोलणं यांचा रुचतं नाही.

- Advertisement -

बुधवारी-बुधवारी जन्माला येणाऱ्या व्यक्तींवर बुधाचा प्रभाव असतो. अशा व्यक्तींना व्यापाराचे गुण चांगले अवगत असतात. बोलण्यात मधाळ असतात . दिसायला आकर्षक असतात. निसर्गात रमणे यांना आवडते.  संशयी स्वभावाच्या असतात.

गुरुवारी- गुरुवारी जन्माला येणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव गंभीर असतो. त्यांच्या सरळ आणि सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याच्या नादात बरेचदा स्वत:चे  नुकसान होते. जर या व्यक्तींचा गुरु बरोबर नसेल तर संबंधित व्यक्ती भविष्यात डाकू, ढोंगी साधु बनू शकते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -