रायगड जिल्ह्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांची उपासमार; ८ महिन्यांपासून वेतनच नाही

रायगड जिल्ह्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांची उपासमार; ८ महिन्यांपासून वेतनच नाही

रायगड जिल्ह्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांची उपासमार; ८ महिन्यांपासून वेतनच नाही

रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर कंत्राटी वाहनचालक आणि सफाई कामगारांची नियुक्ती करण्यात आली. मात्र त्यांना गेल्या ८ महिन्यांपासूनचे मानधन थकीत असल्याने हे कर्मचारी अडचणीत आले आहेत. रायगड जिल्ह्यातील ५४ वाहनचालक आणि ४८ सफाई कामगार मानधनाशिवाय काम करीत असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याने जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर माने यांच्याविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. त्यांनी निदर्शने करून डॉ. मोरे यांची भेट घेत समस्यांबाबतचे निवेदन दिले.

कोरोनाच्या कठीण कालावधीत २४ तास या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सेवा दिली. अशा भयाव परिस्थितीतही त्यांनी लसीकरणाच्या कालावधील नियुक्ती आदेश नसतानाही उपजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. देसाई यांच्या तोंडी आदेशाने काम केले. मार्च ते ऑगस्ट २०२१ आणि तत्पूर्वी, नोव्हेंबर, डिसेंबर २०१८ असे एकूण ८ महिन्यांचे मानधन अद्यापी त्यांना मिळालेले नाही. मानधन मिळत नसल्याने हतबल झालेल्या कर्मचार्‍यांनी अखेर बुधवारी जिल्हा परिषदेसमोर निदर्शने केली. तसेच पैसे नसल्यामुळे उपासमार, कुटुंबातील सदस्यांचे आजारपण काढणे त्यांना कठीण जात असल्याची व्यथा त्यांनी बोलून दाखविली. निवेदनाची प्रत मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच जिल्हाधिकार्‍यांनाही देण्यात येणार आहे.


हे ही वाचा – मुख्यमंत्र्यांनी व्यासपीठावर कानात काय सांगितले?, रावसाहेब दानवेंनी सांगितला किस्सा


 

First Published on: September 17, 2021 3:18 PM
Exit mobile version