घरताज्या घडामोडीमुख्यमंत्र्यांनी व्यासपीठावर कानात काय सांगितले?, रावसाहेब दानवेंनी सांगितला किस्सा

मुख्यमंत्र्यांनी व्यासपीठावर कानात काय सांगितले?, रावसाहेब दानवेंनी सांगितला किस्सा

Subscribe

कानात राजकारणात काहीही सांगत असतो, त्यांनी मला सांगितले, जे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात ऐकत होते.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. या जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमादरम्यान सत्ताधारी आणि विरोधक एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. यावेळी भाषणादरम्यान सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधकांनी जोरदार फटकेबाजी केली आहे. व्यासपीठावर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे बसले होते यावेळी मुख्यमंत्र्यांनी दानवेंच्या कानात काहीतरी सांगताना दिसत आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कानात काय सागितले यावर रावसाहेब दानवेंनी माहिती दिली आहे. सगळ्याच गोष्टी राजकारणात सांगायच्या नसतात. अनेक गप्पागोष्टी झाल्या असल्याचेही केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितलं आहे.

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री आणि त्यांच्यात झालेल्या संभाषणाबाबत उत्तर दिलं आहे. मुख्यमंत्र्यांनी व्यासपीठावर कानात काय सांगितले? असा प्रश्न दानवेंना विचारला असता दानवेंनी अनेक कान गोष्टी झाल्या असल्याचे म्हटलं आहे. कार्यक्रमादरम्यान रावसाहेब दानवेंच्या कानात मुख्यमंत्री काहीतरी सांगताना दानवेंच्या चेहऱ्यावर मिश्किल हावभाव दिसले. तसेच मुख्यमंत्री बोलत असताना दानवे हसत मान डोलवत होते.

- Advertisement -

दानवेंच्या कानात मुख्यमंत्र्यांनी काय सांगितले?

कानात राजकारणात काहीही सांगत असतो, त्यांनी मला सांगितले, जे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात ऐकत होते. मला बाळासाहेबांच्या उपस्थितीमध्ये म्हटलं..

मुख्यमंत्री – रावसाहेब तुम्ही मुंबईला येत नाहीत का? येत जा आल्यानंतर भेटा. काँग्रेसचा माणूस कोणी त्रास द्यायला लागला तर आम्ही भाजपच्या नेत्याला बोलवत असतो.

- Advertisement -

दानवे – साहेब.. मग तर नक्कीच येईल.. पण मला वाटत नाही की, तुम्हाला त्रास देत असतील

मुख्यमंत्री – तुम्हाला काय माहिती

अशा अनेक कान गोष्टी झाल्या आहेत. सगळ्याच गोष्टी राजकारणात सांगायच्या नसतात. अनेक गप्पागोष्टी झाल्या असल्याचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले आहे. तसेच ज्या सांगण्यासारख्या गोष्टी सांगितल्या आहेत. काही गोष्टी या सांगायच्या नसतात. आमच्या दोघांच्या वक्तव्यावर आमचा मतदार खुश आहे. त्यांनी माझ्याकडे काही आपेक्षा व्यक्त केल्या आहेत मी काही आपेक्षा व्यक्त केल्या आहेत. आम्ही मुंबईत भेटून अधिक चर्चा करणार असल्याचेही रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : मुख्यमंत्र्यांची भाजपला खुली ऑफर, फडणवीस म्हणतात मला तसं चित्र दिसत नाही


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -