Live Update: सायन बस स्टापवर सकाळी ८ वाजल्यापासून बससाठी लांबच लांब रांगा

Live Update: सायन बस स्टापवर सकाळी ८ वाजल्यापासून बससाठी लांबच लांब रांगा

Live update Mumbai Maharashtra

सायन बस स्टापवर सकाळी ८ वाजल्यापासून बससाठी लांबच लांब रांगा
शिवसेनाच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त आज शिवसेना भवनावर शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांनी भगवा फडकला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर सभा आयोजन करण्यास निर्बंध असल्याने ऑनलाईन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेनेचे नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे, खासदार अनिल देसाई, आमदार दिवाकर रावते, आमदार सदा सरवणकर, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, नगरसेविका श्रद्धा जाधव उपस्थित होत्या. शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त सिंधुदूर्गात १ लिटर पेट्रोल मोफत देण्याचा उपक्रम राबवला. महागाईविरोधात प्रातिनिधीक आंदोलन आणि वर्धापनदिनानिमित्त शिवसेने हा उपक्रम राबवला. त्यानंतर सिंधुदूर्ग येथील कुडाळच्या पेट्रोल पंपावर भाजप व शिवसेना कार्यर्त्यांमध्ये वाद सुरु झाला.
देशात गेल्या २४ तासात ६०,७५३ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ९७,७४३ कोरोना रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. देशात गेल्या २४ तासात १ हजार ६४७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात सध्या ७ लाख ६० हजार १९ अँक्टिव्ह रुग्ण आहेत.
३० ते ४० वयोगटातील नागरिकांचे लसीकरण
खेड,दापोली,मंडणगडमध्ये गेल्या २ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे खेड जगबुडी नदी आणि नारंगी नदीने धोक्याची पाकळी ओलांडली. त्यामुळे खेड,दापोली,मंडणगड मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.
भारताचे माजी धावपटू मिल्खा सिंग यांचे कोरोनाने निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. चंदीगडच्या रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
First Published on: June 19, 2021 9:09 AM
Exit mobile version