Live Update : मुंबईत आज 192 नवे कोरोनाबाधित रुग्ण, तर 350 रुग्ण कोरोनामुक्त

Live Update : मुंबईत आज 192 नवे कोरोनाबाधित रुग्ण, तर 350 रुग्ण कोरोनामुक्त

Live update Mumbai Maharashtra

मुंबईत आज 192 नवे कोरोनाबाधित रुग्ण, तर 350 रुग्ण कोरोनामुक्त
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे घाटकोपरमध्ये दाखल
कुडाळ नगर पंचायतीमध्ये शिवसेना- भाजपामध्ये राडा
काँग्रेसने दडपशाहीचे राजकारण केले – आशिष शेलार
पटोलेंनी कितीही नौंटकी केली तरी काही उपयोग नाही – देवेंद्र फडणवीस
काँग्रेसने देशाची माफी मागावी – देवेंद्र फडणवीस
मुंबईतील लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी काँग्रेसने आंदोलन मागे घेतले. आम्ही भाजपसारखे नाही. आम्ही लोकांचा विचार करणारे आहोत – नाना पटोले
काँग्रेसने आंदोलन थांबवले – नाना पटोले
बाबुलनाथ येथे आंदोलनात महिला भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत बाचाबाची
बाबुलनाथ परिसरातून भाजप कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
काँग्रेसच्या आंदोलनात वारकऱ्यांचा सहभाग
पटोलेंनी ही नाटकं बंद करावी. हायकमांडला खुश करण्यासाठी काँग्रेसची नौटंकी आहे – राम कदम
नाना पटोलेंना पोलिसांनी अडवलं. आझाद मैदानात आंदोलन करण्याची पोलिसांनी केली विनंती
महाराष्ट्रद्रोही भाजपचा निषेध असो – अतुल लोंढे
अतुल लोंढे पोलिसांच्या ताब्यात
शिवसेनेवर टीका करणाऱ्या सर्वांना उद्या उत्तरे मिळतील. उद्या शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार. शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार – संजय राऊत
भाजपचे साडेतीन लोक अनिल देशमुखांच्या कोठडीत असतील – संजय राऊत
देशात मागील २४ तासात ३४, ११३ कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ९१, ९३० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे ३४६ कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात सध्या ४,७८,८८२ अँक्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत.
नाना पटोलेंच्या बंगल्याबाहेरुन भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले
नाना पटोलेंच्या बंगल्याबाहेब भाजप नेत्यांचे आंदोलन
देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याकडे जाणारे दोन्ही रस्ते बंद करण्यात आले आहेत.
प्रसाद लाड यांच्या सायन येथील कार्यालयाबाहेर भाजप कार्यकर्त्यांची गर्दी
भाजप नेते मंगल प्रभात लोढा  फडणवीसांच्या सागर बंगल्यावर उपस्थित
प्रसाद लाड यांच्या कार्यलयाच्या बाहेर पोलीस बंदोबस्त
देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्याबाहेर आंदोलनाचा काँग्रेसचा इशारा
नाशिकमध्ये प्रेमप्रकरणातून पेट्रोल टाकून जाळण्यात आलेल्या देवळा तालुक्यातील गोरख बच्छाव या तरुणाचा तरुणाचा मृत्यू झाला आहे. गोरखवर जिल्हा रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. पेट्रोल टाकून प्रेयसी आणि तिच्या कुटुंबाला पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
First Published on: February 14, 2022 7:24 PM
Exit mobile version