Corona Live Update: सांगलीत कोरोनाबाधिताचा मृत्यू, आतापर्यंत जणांचा १३ मृत्यू

Corona Live Update: सांगलीत कोरोनाबाधिताचा मृत्यू, आतापर्यंत जणांचा १३ मृत्यू

कोरोना व्हायरस लाईव्ह अपडेट

सांगली जिल्ह्यामध्ये कोरोनाने आतापर्यंत १३ जणांचे प्राण घेतले आहेत. सांगली जिल्ह्यात सुरुवातील वाढलेला कोरोनाचा संसर्ग मध्यंतरी कमी झाला होता. मात्र पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. सांगली शहरात आज तीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले. सांगली जिल्ह्यात आतापर्यंत साडे चारशेच्या आसपास कोरोना रुग्ण आढळले आहेत.
कोरोना विरुद्धच्या लढाईतील एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा होत आहे. एसटी मधील कोरोनाग्रस्त कर्मचाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढतेच आहे. आतांपर्यत राज्यात एकूण ११४ कर्मचारी कोरोना बाधित झाले आहे. यामध्ये मुंबई विभागात ५६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली असून आतापर्यंतचा एसटी महामंडळातील हा आकडा सर्वाधिक आहे. तर ठाणे विभागात ३० कर्मचारी बाधित झाले असून २ कर्मचाऱ्यांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याची माहिती एसटी महामंडळांनी दिली आहे. त्यामुळे एसटी महामंडळात खळबळ उडाली आहे.
गेल्या २४ तासांत इंडो-तिबेट सीमेवरील १८ पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. सध्या १५१ कोरोनाबाधित पोलिसांवर उपचार सुरू असून २७० जवान रिकव्हर झाले आहेत, अशी माहिती इंडि-तिबेट सीमेवरील पोलिसांनी दिली आहे.
गेल्या २४ तासांत ३६ बीएसएफच्या जवान कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून ३३ जण रिकव्हर झाले आहे. तसेच सध्या ५२६ जवानांवर उपचार सुरू आहे आणि ८१७ जण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत.
अमरावतीमध्ये आज १२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकूण बाधितांचा आकडा ६९२वर पोहोचली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची आज भेट घेतली आहे. चीन सोबत असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मोदींनी राष्ट्रपतींची भेट घेतली असल्याचे म्हटले जात आहे.
आज सकाळी औरंगाबाद जिल्ह्यात १२८ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ६ हजार ६४४वर पोहोचला आहे. सविस्तर वाचा 
राज्यात २४ तासांत कोरोनामुळे चार पोलिसांचा मृत्यू झाला असून ३० पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. त्यामुळे आतापर्यंत राज्यात कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा ५ हजार २०५वर पोहोचला असून यापैकी ४ हजार ७१ पोलिस रिकव्हर झाले आहेत आणि १ हजार ७० जणांवर सध्या उपचार सुरू आहे, अशी माहिती महाराष्ट्र पोलीस दलाने दिली आहे. सविस्तर वाचा 
देशात २४ तासांत सर्वाधिक २४ हजार ८५० नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून ६१४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ६ लाख ७३ हजार १६५वर पोहोचला असून आतपर्यंत १९ हजार २६८ जणांचा मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचा 
जगभरात कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, जगभरात आतापर्यंत १ कोटी १३ लाखांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यापैकी ५ लाख ३३ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत ६४ लाख ३९ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
First Published on: July 5, 2020 8:23 PM
Exit mobile version