Coronavirus Live Update : मुंबईत २४ तासात ११७९ नवे रूग्ण

Coronavirus Live Update : मुंबईत २४ तासात ११७९ नवे रूग्ण

कोरोना व्हायरस लाईव्ह अपडेट

मुंबईत २४ तासात ११७९ नवे रूग्ण

आज मुंबईत २४ तासात ११७९ नव्या रूग्णांची वाढ झाली आहे. तर ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ९१७ रूग्णांना घरी सोडण्यात आलं आहे. आता एकूण मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या १४५८०५ वर गेली आहे. तर मुंबीत आतापर्यंत ७६५५ लोकांनी आपला जीव गमावला आहे.


२४ तासात  राज्यात ११,८५२ नवीन रुग्ण

आज राज्यात ११,८५२ नवीन रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर १८४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर ११,१८५ रूग्ण आज बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ७,९२,५४१ झाली आहे.


अभिनेता सुबोध भावे पाठोपाठ अभिनेता अभिजीत केळकरलाही कोरोनाची लागण झाली आहे. पाठीत दुखत असल्याकारणाने डॉक्टरांकडे अभिजीत गेला असता, कोरोनाची टेस्ट करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्याची टेस्ट ही पॉझिटिव्ह आली.


सुबोध भावेसह पत्नी आणि मुलाला कोरोनाची लागण

मराठी अभिनेता सुबोध भावेला करोनाची लागण झाली आहे. सुबोधने स्वतः सोशल मीडियावर याची माहिती दिली आहे. सुबोध भावेसह त्याची पत्नी मंजिरी आणि मोठा मुलगा कान्हा या दोघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्याच्या दुसऱ्या मुलाला मल्हारला मात्र, कोरोनाची लागण झाली नाही. तिघांनीही स्वतःला घरीच क्वारंटाईन करून घेतले आहे.


कोरोनाचा फैलाव दिवाळीपर्यंत नियंत्रणात येणार – केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचा विश्वास

जगभरासह देशात वाढणाऱ्या कोरोनाबाधितांचा आकडा हा सर्वानाच चिंतेत टाकणारा आहे. दरम्यान रविवारी आलेल्या कोरोना रुग्णांच्या विक्रमी संख्येमुळे देशातील कोरोना कधी नियंत्रणात येणार, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. या प्रश्नावर उत्तर देताना केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी असा विश्वास व्यक्त केला की, “दिवाळीपर्यंत देशातील कोरोना प्रसार हा नियंत्रणात येईल,” (सविस्तर वाचा)


बांगलादेशने Corona लसीसाठी भारतसह केला करार

बांगलादेशमधील फार्मा कंपनी बेक्सिमोने कोविड -१९ लस घेण्यासाठी भारताच्या सीरम इन्स्टिट्यूट (SII) मध्ये गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. शुक्रवारी झालेल्या करारानंतर ढाकाने या महिन्यात सीरम लसीची चाचणी घेण्यास सहमती दर्शविली. तर बांगलादेशने चीनच्या सिनोवेक बॉयोटेक लसीच्या मानवी चाचण्यांच्या अंतिम टप्प्यास मान्यता दिली आहे. (सविस्तर वाचा)


देशात २४ तासांत ७८ हजार ५१२ नवे रुग्ण; बाधितांचा आकडा ३६ लाखांवर!

देशात पुन्हा एकदा सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. मागील २४ तासांत समोर आलेली कोरोनाबाधितांची आकडेवारी ही धडकी भरवणारी आहे. गेल्या २४ तासांत ७८ हजार ५१२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून ९७१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या ३६ लाखावर पोहोचली असून मृतांची संख्या ६४ हजार ४६९ इतकी झाली आहे. तसेच सध्या देशात ७ लाख ८१ हजार ९७५ active केसेस असून २७ लाख ७४ हजार ८०२ जण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.


राज्यात कोरोनाची स्थिती चिंताजनक असून आज १६ हजार ४०८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७,८०,६८९ झाली आहे. राज्यात आज १,९३,५४८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात आज २९६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या २४ हजार ३९९ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ३.१३ टक्के एवढा आहे.

First Published on: August 31, 2020 2:22 PM
Exit mobile version