घरदेश-विदेशबांगलादेशने Corona लसीसाठी भारतसह केला करार; Beximco करणार गुंतवणूक!

बांगलादेशने Corona लसीसाठी भारतसह केला करार; Beximco करणार गुंतवणूक!

Subscribe

बांगलादेशमधील फार्मा कंपनी बेक्सिमोने कोविड -१९ लस घेण्यासाठी भारताच्या सीरम इन्स्टिट्यूट (SII) मध्ये गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे.

बांगलादेशमधील फार्मा कंपनी बेक्सिमोने कोविड -१९ लस घेण्यासाठी भारताच्या सीरम इन्स्टिट्यूट (SII) मध्ये गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. शुक्रवारी झालेल्या करारानंतर ढाकाने या महिन्यात सीरम लसीची चाचणी घेण्यास सहमती दर्शविली. तर बांगलादेशने चीनच्या सिनोवेक बॉयोटेक लसीच्या मानवी चाचण्यांच्या अंतिम टप्प्यास मान्यता दिली आहे.

कोरोना लस घेण्यासाठी करार

बेक्सिमोने निवेदनात म्हटले आहे की, लस मंजूर झाल्यानंतर बांगलादेश सीरमच्या प्राधान्याने लस घेणारा देश होणार आहे. बांगलादेशच्या कंपनीने गुंतवणूकीची रक्कम उघड केलेली नाही यासह सीरमच्या लसीचे किती डोस मिळणार आहे हेदेखील त्यांनी सांगितले नाही. या दोन कंपन्यांच्या प्रमुखांनी असे निवेदन जारी केले की, “ऐतिहासिक करारामुळे दोन्ही देशांमधील सहकार्याचा परस्पर हेतू दिसून येत आहे.” निवेदनात म्हटले आहे की, सर्व जगावर असलेल्या कोरोनाच्या संबंधित आव्हानांवर मात करण्यासाठी अजून बराच पल्ला गाठायचा आहे. दरम्यान, बेक्सिमो बांगलादेशात सीरम लसचा पुरवठादार असणार आहे.

- Advertisement -

बांगलादेशातील फार्मा कंपनी सीरममध्ये करणार गुंतवणूक

बांगलादेशाची फार्मा कंपनी या लसांच्या संख्येबाबत सरकारबरोबर असलेल्या गरजांची चर्चा करणार आहे. याव्यतिरिक्त, बेक्सिमोला बांगलादेशातील खासगी संस्थांना वितरणासाठी अतिरिक्त डोस देखील मिळणार आहे. सीरम जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. फार्मा कंपनी तीन कोविड लसांची चाचणी घेत आहे. आंतरराष्ट्रीय पुरवठ्यासाठी कोविड -१९ लसीच्या अब्ज डोससाठी ऑस्ट्राजेनकासह भागीदारी केली आहे.


धक्कादायक : मृतदेहांची अदलाबदल; नाशिकचा मृतदेह थेट मध्यप्रदेशात

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -