Corona Live Update: रोज होतेय १ लाख २० हजार कोरोनाबाधितांची टेस्ट

Corona Live Update: रोज होतेय १ लाख २० हजार कोरोनाबाधितांची टेस्ट

कोरोना व्हायरस लाईव्ह अपडेट

इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात ICMR च्या निवेदिता गुप्ता यांनी सांगितले की, १ जून पासून आपण ६८१ प्रयोगशाळांद्वारे कोरोनाबाधितांच्या टेस्ट करत आहोत. यामध्ये ४७६ सरकारी तर २०५ खासगी प्रयोगशाळा आहेत. ज्यामधून रोज १ लाख २० हजार कोरोनाबाधितांच्या टेस्ट केल्या जात आहेत.


मालाड वाहतूक विभाग येथे कार्यरत असलेले ४९ वर्षीय पोलीस हवालदार यांचे १ जून रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास कोरोनामुळे निधन झालेले आहे.


करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वडाळागाव ‘सील’

नाशिक शहरातील दाटलोकवस्ती असलेल्या वडाळागावात करोनाने धुमाकूळ घातला आहे. वडाळागाव करोनाचे हॉटस्पॉट झाले असून हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील २९ रुग्ण करोनाबाधित आहेत. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेकडून उपाययोजना केल्या जात आहे. महापालिका व पोलिसांनी वडाळागावात बॅरिकेड लावून सर्व रस्ते बंद केले आहेत. (सविस्तर वाचा)


वर्ध्यातील २१ वर्षीय कोरोनामुक्त तरुणीचा मेंदूज्वराने मृत्यू

कोरोनावर करणाऱ्या २१ वर्षीय तरुणीचा मेंदूज्वराने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. वर्धा जिल्ह्यातील सावंगी मेघे रुग्णालयात आज पहाटेच्या सुमारास तरुणीने अखेरचा श्वास घेतला.


नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या ५७१

नागपुरातील हॉटस्पॉट मध्ये कोरोना रुग्णांची वाढत असतानाच आता नवीन भागातही कोरोनाचा प्रभाव वाढताना दिसत आहे. नागपुरातील काही नवीन भाग आता कोरोनाचे हॉटस्पॉट बनत आहे. गड्डीगोदाम, नाईक तलाव, लोकमान्य नगर, टिमकी या भागात रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे. आज नागपुरात नव्या १२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे नागपुरातील कोरोनाबाधितांचा आकडा ५७१ वर पोहोचला आहे. (सविस्तर वाचा)


रायगडमध्ये ३ जूनला जनता कर्फ्यू

महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर ३ जूनला चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


क्वॉरंटाईन सेंटरमध्ये भाजीत आढळला विंचू

क्वॉरंटाईन सेंटरमध्ये जेवण सुरु असताना जेवणातील भाजीमध्ये चक्क विंचू आढळल्याचा धक्कादायक प्रकार बिहारमध्ये घडला आहे. या प्रकारामुळे चार जणांची तब्येत बिघडल्याची माहिती समोर आली आहे. हा किळसवाणा प्रकार बिहारमधील दरभंगा येथील बद्री यादव उत्क्रमिक माध्यमिक शाळेत घडल्याचे उघडकीस आले आहे. (सविस्तर वाचा)


कोरोनासोबतच अर्थव्यवस्थेकडेही लक्ष द्यावं लागणार – पंतप्रधान

‘जगासोबतच भारतात आज कोरोनाचं संकट आहे. त्यामुळे आपल्याला कोरोना विषाणूशी तर लढायचं आहेच. पण त्यासोबतच आपल्याला अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी देशाच्या अर्थव्यवस्थेकडेही लक्ष द्यावं लागणार आहे’, अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज साधलेल्या ऑनलाईन संवादात मांडली. भारतीय उद्योग संघ अर्थात CII ला १२५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा ऑनलाईन संवाद साधला. या संवादात देशाच्या उद्योग क्षेत्रातले अनेक दिग्गज उपस्थित होते. ‘या देशाची क्षमता, प्रतिभा आणि तंत्रज्ञानावर माझा विश्वास आहे. भारतीय अर्थव्यवस्था निश्चितच विकासाच्या मार्गावर परतेल’, असा विश्वास यावेळी पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला. (सविस्तर वाचा)


Lockdown: ‘या’ ट्रॅव्हल कंपनीतील ३५० कर्मचाऱ्यांनी गमावली नोकरी

कोरोनाच्या संकटात लॉकडाऊन असल्यामुळे सर्वच अर्थकारण कोलमडून पडले आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात ही परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, याचा सर्वाधिक फटका ट्रॅव्हल बिझनेसवर पडला असल्याचे पाहायला मिळत आहे. जगभरात पर्यटकांच्या ये-जा करण्यावर निर्बंध आले असून यापुढेही काही काळ ते निर्बंध कायम राहणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे जगभरातील ट्रॅव्हल कंपन्यांना त्याचा फटका बसला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता सर्वात आधी म्हणजेच जानेवारीपासून ट्रॅव्हल कंपन्या बंद करण्यात आल्या होत्या. भारतातील प्रसिद्ध ट्रॅव्हल कंपनी मेकमायट्रीपलाही त्याचा मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळत आहे. या कंपनीतील तब्बल ३५० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे. (सविस्तर वाचा)


गेल्या २४ तासांत देशात ८ हजार १७१ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर २०४ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. तर सध्या देशात १ लाख ९८ हजार ७०६ कोरोनाबाधित रुग्ण असून यातील ९५ हजार ५२६ जणांना घरी सोडण्यात आले आहे.


राज्यात सोमवारी २३६१ नवीन रुग्णांची नोंद झाली असून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७० हजार १३ झाली आहे. तसेच ७६ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या २३६२ वर पोहोचली आहे. सोमवारी ७७९ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आल्याने आजपर्यंत ३० हजार १०८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

सोमवारी झालेल्या ७६ मृत्यूपैकी कुठे किती मृत्यू?

First Published on: June 2, 2020 5:48 PM
Exit mobile version