घरताज्या घडामोडीक्वॉरंटाईन सेंटरमध्ये भाजीत आढळला विंचू; ४ जणांची बिघडली तब्येत

क्वॉरंटाईन सेंटरमध्ये भाजीत आढळला विंचू; ४ जणांची बिघडली तब्येत

Subscribe

क्वॉरंटाईन सेंटरमध्ये जेवण सुरु असताना जेवणातील भाजीमध्ये चक्क विंचू आढळल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

क्वॉरंटाईन सेंटरमध्ये जेवण सुरु असताना जेवणातील भाजीमध्ये चक्क विंचू आढळल्याचा धक्कादायक प्रकार बिहारमध्ये घडला आहे. या प्रकारामुळे चार जणांची तब्येत बिघडल्याची माहिती समोर आली आहे. हा किळसवाणा प्रकार बिहारमधील दरभंगा येथील बद्री यादव उत्क्रमिक माध्यमिक शाळेत घडल्याचे उघडकीस आले आहे.

नेमके काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार; दरभंगा येथील बद्री यादव उत्क्रमिक माध्यमिक शाळेत ४५ लोकांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. या लोकांना नेहमीप्रमाणे जेवण आले. त्या दरम्यान, दहा जण जेवत होते. अचानक यातील मनोज यादव या व्यक्तीने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. याबाबत त्या व्यक्तीकडे विचारणा केली असता त्यांनी आपल्या ताटातील भाजीमध्ये आढळलेला विंचू दाखवला. हा प्रकार पाहून इतर चार जणांची अचानक तब्येत बिघडली आणि त्यांना उलट्या होण्यास सुरुवात झाली.

- Advertisement -

दरम्यान, हा घडलेला सर्व प्रकार विद्यालयाचे मुख्यध्यापक राम यादव यांना सांगण्यात आला. त्यानंतर त्यांनी तात्काळ हा घडलेला प्रकार सीईओ अजीत कुमार यांना सांगितला आणि त्यांनी जेवण बनवणाऱ्या आचाऱ्यांना याबाबत जाब विचारला.

४५ लोकांचा जेवणाला नकार

हा प्रकार घडल्यानंतर क्वॉरंटाईन सेंटरमधील ४५ लोकांनी जेवणाला नकार दिला. त्यानंतर बनवलेले सर्व अन्न टाकून देऊन, पुन्हा जेवण बनवण्यात आले.

- Advertisement -

चार जणांची तब्येत बिघडली

हा प्रकार घडल्यानंतर क्वॉरंटाईन सेंटरमधील चार जणांची तब्येत बिघडली. त्यांना अचानक उलट्या झाल्या. नंतर क्वॉरंटाईन सेंटरमधील डॉक्टरांनी त्यांना गोळ्या देऊन हा प्रकार पाहिल्यामुळे उलट्या झाल्याचे सांगितले. दरम्यान, आता चारही जणांची तब्येत व्यवस्थित असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.


हेही वाचा – राज्यघटनेतून इंडिया शब्द काढून टाकण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात आज होणार सुणावणी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -