Live Updates: मुंबईत गेल्या २४ तासांत ८ हजाराहून अधिक रुग्ण; २३ जणांचा मृत्यू

Live Updates: मुंबईत गेल्या २४ तासांत ८ हजाराहून अधिक रुग्ण; २३ जणांचा मृत्यू
मुंबईत गेल्या २४ तासात ८ हजार ९३८ नवे रुग्ण आढळले आहेत. ४ हजार ५०३ रुग्ण हे बरे झाले आहेत. तर २३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज ४८ हजार ९०२ चाचण्या करण्यात आल्या. मुंबई एकूण रुग्ण – ३,९२,५१४, बरे झालेल्या रुग्णांचा दर- ८० टक्के, एकूण सक्रिय रुग्ण- ८६,२७९, दुप्पटीचा दर- ३३ दिवस, कोविड वाढीचा दर (१ एप्रिल-७ एप्रिल)- २.०३ टक्के एवढा आहे.
राज्य सरकारला जनतेची काळजी पण भाजप राजकारण करत आहे. – नाना पटोले केंद्र सरकार जनतेचा जीव धोक्यात टाकतेय डॉ.हर्षवर्धन यांनी माफी मागावी – नाना पटोले
भाजपचे ज्येष्ठ नेते एल. के. अडवाणी यांनी कोरोना लसीचा घेतला दुसरा डोस
महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या असताना दुजाभाव का? केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना राजेश टोपेंचा सवाल साडेसात लाख फक्त लस दिली आहे – राजेश टोपे उत्तर प्रदेश ४८ लाख मध्यप्रदेश ४० लाख हरियाणा २४ लाख लस दिला – राजेश टोपे
सचिन वाझेला घेऊन एनआयए पथक पुन्हा जे.जे रुग्णालयाकडे रवाना
खासदार सुप्रिया सुळेंनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस, मुख्य सचिव सीताराम कुंटे यांंनीही घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस
कल्याणराव काळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला आहे.
भारत भालकेंचे स्वप्न पुर्ण करु, उपमुख्यमंत्री म्हणून सगळी ताकद पणाला लावेन – अजित पवार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना लसीचा दुसरा डोस घेणार, जे.जे रुग्णालयात घेणार कोरोना लसीचा दुसरा डोस
कठोर निर्बंधांमुले व्यापारी वर्गाला मोठी झळ – शरद पवार सर्व परिस्थीतीला धैर्याने सामोरे गेले पाहिजे – शरद पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार पंढरपुरात दाखल, कल्याणराव काळे अजित पवारांच्या उपस्थितीत करणार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
देशात बुधवारी १ लाख २६ हजार ७८९ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
देशात आतापर्यंत २५ कोटी २६ लाख ७७ हजार ३७९ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यामधील गेल्या २४ तासात १२ लाख ३७ हजार ७८१ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.
रेमडेसिवीरच्या पुरवठ्याबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी आज दुपारी ४ वाजता बोलावली बैठक
नांदेडमध्ये रेमेडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या चौघांना अटक,पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केल्यानंतर अटक,५हजार ४०० रुपये किंमत असताना ८ हजार रुपयाला विक्री
महाराष्ट्रात कोरोनापरिस्थितीची आढावा घेण्यासाठी केंद्राची ३० आरोग्य पथके आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर
न्यूजीलैंडमध्ये भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी, तसेच न्यूजीलैंडच्या लोकांनाही भारतातून आल्यास प्रवेश बंदी असेल, न्यूजीलैंडच्या पंतप्रधानांचा मोठा निर्णय
अनिल देशमुख यांच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात जाऊन कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे.
First Published on: April 8, 2021 7:31 PM
Exit mobile version