Lok Sabha Election 2024 : देशात EVMवरच होणार मतदान; बॅलेट पेपर संदर्भातील याचिका SCने फेटाळल्या

Lok Sabha Election 2024 : देशात EVMवरच होणार मतदान; बॅलेट पेपर संदर्भातील याचिका SCने फेटाळल्या

दिल्ली : देशभरात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. शुक्रवारी (26 एप्रिल) सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवता झाली असून देशातील मणिपूरमध्ये सर्वाधिक 54 टक्के मतदान झाल्याची माहिती समोर येत आहे. तसेच, महाराष्ट्रा केवळ 32 टक्के मतदान झाल्याची माहिती समोर येत आहे. अशात सर्वोच्च न्यायालयाचा ईव्हीएम व्हीव्हीपॅटबाबत महत्त्वपूर्ण निकाल समोर आला आहे. बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची याचिका फेटाळली आहे. VVPAT पडताळणीची मागणी करणाऱ्या सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळल्या. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे व्हीव्हीपॅट स्लिपसह ईव्हीएमद्वारे 100 टक्के मते जुळवण्याच्या मागणीला मोठा धक्का बसला आहे. (The Supreme Court dismissed the petition related to ballot paper and VVPAT)

बॅलेट पेपरवर मतदान घेण्याच्या आणि VVPAT पडताळणीची मागणी करणाऱ्या सर्व याचिकेवर न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने यासंदर्भात निर्णय दिला आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) संघटना आणि इतर काहींनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. त्यात ईव्हीएमशी व्हीव्हीपॅट स्लिप 100 टक्के जुळण्याची मागणी केली होती.

या याचिकांच्या पार्श्वभूमीवर ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटीमध्ये कोणतीही छेडछाड शक्य नसल्याचे निवडणूक आयोगाने खंडपीठाला सांगितले होते. आयोगाने सर्वोच्च न्यायालयाला मशीन्सची सुरक्षा, त्यांचे सील करणे आणि त्यांच्या प्रोग्रामिंगबद्दल देखील माहिती दिली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायलयाने हा निर्णय दिला आहे.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : आवाहन करूनही मतदानाची टक्केवारी वाढेना, नेत्यांना चिंता

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, VVPAT स्लिप 45 दिवस सुरक्षित राहील. या स्लिप उमेदवारांच्या स्वाक्षरीने सुरक्षित ठेवल्या जातील. निवडणुकीनंतर ईव्हीएम युनिट्सही सील करून सुरक्षित ठेवावे. निकाल जाहीर झाल्यानंतर तांत्रिक पथकाकडून ईव्हीएमची सूक्ष्म तपासणी करण्याचा पर्याय उमेदवारांकडे असणार आहे. निवडणुकीच्या निकालानंतर पुढील सात दिवसांत उमेदवाराला पडताळणी करता येणार आहे.

दरम्यान, आज झालेल्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने देशातील निवडणुका या ईव्हीएम मशीनवरच होणार असल्याचा निर्णय दिला. बॅलेट पेपर तसेच ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट यांच्या पडताळणी बाबतच्या सर्व याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या आहेत. कोर्टाचा या निर्णयामुळे निवडणूक आयोगाला मोठा दिलासा मिळाला असून याचिकाकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे.


हेही वाचा – Uddhav Thackeray : तुम्हाला दिल्लीला पाठवणारच, उद्धव ठाकरेंचा वर्षा गायकवाडांना शब्द

Edited By – Vaibhav Patil

First Published on: April 26, 2024 3:10 PM
Exit mobile version