आम्ही बापूंमुळेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अनुभवतोय, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं प्रतिपादन

आम्ही बापूंमुळेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अनुभवतोय, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं प्रतिपादन

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे असलेल्या बापू कुटीला भेट दिली. तसेच भारत राष्ट्र घडविण्यात महात्मा गांधी यांच्या विचारांचे महत्त्व त्यांनी अधोरेखीत केले.

आपण देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव बापूंमुळेच अनुभवतो आहोत. बापूंबद्दल बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, भारताच्या समृद्धीचा विचार हा बापूंच्या विचारातूनच शक्य आहे. सर्व समावेशक आणि मानवी चेहरा असलेला विकास, समता अर्धीष्टीत समाज रचना सर्वांना संधीची समानता, सर्व विचार आणि पूजा पद्धतीबाबत भाव हाच आपला मूलमंत्र आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सर्व समाजाच्या सर्वांगिण विकासाची सेवा बापूंनी मांडली. दरिद्र नारायणाची सेवा हीच ईश्वर सेवा, हे बापूंनी सांगितलं. त्यानंतर मोदींनी बापूंचा मार्ग स्वीकारत गरिब कल्याणाचा अजेंडा त्याठिकाणी तयार केला. या अजेंड्याच्या माध्यमातून तीन कोटी लोकांना घरं मिळाली. सहा कोटी लोकांना पिण्याच्या पाण्याचा नळ घरापर्यंत मिळाला. अडीच कोटी लोकांच्या घरी वीज पोहोचली. कोट्यवधी लोकांच्या घरी शौचालय तयार झाले. पाच कोटी लोकांकडे गॅसचे सिलिंडर तयार झाले.

जो समाजातील शेवटचा व्यक्ती आहे. त्या समाजातील शेवटच्या व्यक्तीचं शेवटचं परिवर्तन जे बापूंना अपेक्षित होतं. तेच परिवर्तन आज देशात घडतंय. येत्या काळात तेच परिवर्तन आपल्याला पुढील काळात घेऊन जायचंय. बापू कुटीमधून नवीन ऊर्जा घेऊन एक बलशाली समाज अशी एक समृद्ध राष्ट्र तयार करण्याचा प्रयत्न आपण सर्व मिळून करूया, असे संकल्प देवेंद्र फडणवीसांनी केले.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा साजरा करण्याचा निर्णय जेव्हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. तेव्हा त्यांनी एकच गोष्ट सांगितली की, आपण स्वातंत्र्य दिन आणि वेगवेगळे सण सोहळे साजरे करतो. परंतु बहुतांशवेळी हे सर्व कार्यक्रम सरकारी होतात. सरकारने निमंत्रित केलेले लोकं किंवा अधिकारी यांच्या पूर्ततेत सिमीत असतात. देशाच्या अमृत महोत्सवाने हा कार्यक्रम समाजाचा झाला पाहिजे. आपल्या इतिहासाचं सिहांवलोकन करता आलं पाहीजे. आपल्या वर्तमानाची परिस्थिती समजून त्यांचं भान ठेवलं पाहीजे आणि भविष्यात आपल्याला काय करायचं आहे, याचा मार्गही आपण ठरवला पाहीजे. या दृष्टीने आझादी का अमृत महोत्सव या ठिकाणी नियोजित करण्यात आला, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.


हेही वाचा : विरोधी पक्षातील नेते फोडण्यात माझाच हात, भाजप नेत्या पंकजा मुंडेंची कबुली


 

First Published on: August 12, 2022 12:16 PM
Exit mobile version