डॉ.महेंद्र कल्याणकरांनी स्वीकारली रायगड जिल्हाधिकारीपदाची सूत्रे

डॉ.महेंद्र कल्याणकरांनी स्वीकारली रायगड जिल्हाधिकारीपदाची सूत्रे

डॉ.महेंद्र कल्याणकरांनी स्वीकारली रायगड जिल्हाधिकारीपदाची सूत्रे

रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी आज अखेर सूत्रे स्वीकारली. यामुळे जिल्हाधिकारी पदासाठी सुरू असलेली स्पर्धा अखेर समाप्त झाली. तत्कालीन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांची अचानक बदली करण्यात आली. यानंतरही त्या जिल्ह्यात येण्यासाठी प्रयत्नाला लागल्या होत्या. तशी चर्चा प्रशासनातही होती. मात्र आता कल्याणकर यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर यातील स्पर्धा संपली.जिल्हाधिकारी पद सांभाळताना निधी चौधरी यांचे स्थानिक राजकीय नेत्यांमध्ये टोकाचे मतभेद हेते. जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, शेकापचे नेते जयंत पाटील यांच्याशी चौधरी यांचे अनेकदा खटके उडाले होते.

नियोजन मंडळाच्या निधी वाटपाच्या मुद्यावर पालकमंत्र्यांचे त्यांच्याशी चक्क भांडण झाले. स्थानिक लोकप्रतिनिधींबरोबरच्या वितुष्टानंतर त्यांची तात्काळ बदली करण्यात आली. नव्याने डॉ. कल्याणकर याच्याकडे पदाची सूत्रे त्यांनी सोपवली. भारतीय प्रशासन सेवेतील 2007 बॅचचे महेंद्र कल्याणकर यांचा यापूर्वी ठाणे जिल्हाधिकारी असताना दोनदा उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून गौरव करण्यात आला होता. ठाणे येथे जिल्हाधिकारी असताना अल्पावधीतच त्यांनी जिल्ह्यात महसूलवाढीसाठी केलेले प्रयत्न, माहिती तंत्रज्ञानाचा परिणामकारक वापर करून जनतेला दिलेली शासकीय सेवा, त्याचप्रमाणे प्रधानमंत्री मुद्रा योजना कर्ज, पीक कर्जवाटपात केलेली लक्षणीय वाढ यासह काही महत्वाकांक्षी योजनांची उत्तम अंमलबजावणी केल्याने प्रशासनाने त्यांना गौरवण्यात आले होते. रायगडचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी मंगळवारी सकाळी मावळत्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडून सूत्रे स्वीकारली.

जलयुक्त शिवार योजनेत लोकसहभागातून केलेली कामे, शासकीय जत्रेसारख्या नावीन्यपूर्ण उपक्रमातून एकाच ठिकाणी केलेले काही लाख दाखल्यांचे वाटप, जिल्हा प्रशासनाचे पहिले कौशल्य विकास केंद्र, सर्वाधिक पेसा गावांसाठी केलेले प्रयत्न या कामांची दखल घेऊन हा विशेष गौरव करण्यात आला होता. ठाणे येथे जिल्हा प्रशासनाचे कौशल्य विकास केंद्र सुरू करून त्यांनी इतर जिल्ह्यांसमोर आदर्श ठेवला होता. या केंद्रातून अनेक गरीब व आर्थिकदृष्ट्या कमकुवत वर्गातील मुलांमुलीनी प्रशिक्षण घेतले व त्यांना नोकर्‍याही लागल्या होत्या. ठाण्यातच जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने एक दिवसभरासाठीच्या सर्वात मोठे नेत्र चिकित्सा शिबिर त्यांनी आयोजित केले होते , या शिबिरात विशेषत: ग्रामीण भागातून शेकडो नागरिकांनी मोफत तपासणी करून घेतली होती. शासनाच्या डिजिटल इंडिया कार्यक्रमांर्गत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाला ‘डिजिटल चॅम्पियनशिप’ डॉ. कल्याणकर यांनी प्राप्त करून दिली. याशिवाय अनधिकृत रेती उत्खनन करणार्‍या रेतीमाफियांवर सडेतोड कारवाई करून राज्यात सर्वाधिक दंड वसुली त्यांनी करून दिली होती.


हेही वाचा – Narayan Rane Vs Shivsena : शरद पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया….


 

First Published on: August 24, 2021 9:12 PM
Exit mobile version