घरताज्या घडामोडीNarayan Rane Vs Shivsena : शरद पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया....

Narayan Rane Vs Shivsena : शरद पवारांनी दिली पहिली प्रतिक्रिया….

Subscribe

केंद्रीय नारायण मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटत असतानाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही याबाबतची प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावेळी शरद पवार यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत या विषयावर उत्तर दिले. शरद पवार हे नेहमीच एखाद्या विषयावर बोलताना पक्ष म्हणून भूमिका मांडत असतात. नारायण राणे यांच्या विषयावरही त्यांची प्रतिक्रिया बोलकी आहे. नारायण राणे यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली होती. त्यापाठोपाठच आता शरद पवार यांचीही सूचक प्रतिक्रिया समोर आली आहे. (Sharad Pawar reaction on narayan rane statement over Cm slapping)

संपुर्ण महाराष्ट्रात नारायण राणे यांच्या मुख्यमंत्र्यांवरील वक्तव्यामुळे वाद शिगेला पोहचला आहे. याबाबतची प्रतिक्रिया प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारली. त्यावर शरद पवार यांनी मला या विषयावर काहीच बोलायचे नाही असे स्पष्ट केले. नारायण राणेंना मी महत्व देत नाही. नारायण राणे जे बोललेत ते त्यांच्या पद्धतीने बोलले असतील, त्यांच्या संस्काराप्रमाणेच नारायण राणे बोलले असावेत असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे नेहमीप्रमाणेच शरद पवार यांनी ज्या विषयाला महत्व द्यायचे नाही, अशा विषयावर प्रतिक्रिया न देणे पसंत केले.

- Advertisement -

जयंत पाटील काय म्हणाले ?

केंद्रात नव्याने मंत्री झालेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेले वक्तव्य हे त्यांचे नसून नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य समजावं लागेल कारण त्यांनीच नारायण राणे यांना मंत्री केले आहे असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. जयंत पाटील यांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया देताना म्हटले की, मी जयंत पाटील यांना विद्वान समजत होतो. पण आता नक्कीच पुन्हा एकदा याबाबतचा विचार करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.


हे ही वाचा – ‘जेव्हा आमचा बाण सुटेल तेव्हा पाहा काय होईल’; संजय राऊत यांची नारायण राणेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -