ग्रामीण भागात गुटखा विक्री तेजीत

ग्रामीण भागात गुटखा विक्री तेजीत

ग्रामीण भागात गुटखा विक्री तेजीत

बंदी असलेला गुटखा शहरास सुधागड तालक्यात ग्रामीण भागातील परळी, पेडली, जांभुळपाडा आणि लगतच्या परिसरामध्ये खुलेआमपणे उपलब्ध होत आहे. या अवैध गुटखा विक्रीला आशीर्वाद कुणाचा,असा सवाल उपस्थित केला जात आहे. रायगड जिल्ह्यातील विविध भागांतून गुटखा सापडण्याच्या घटना घडतात. मात्र त्यानंतर तडजोडीचाच भाग अधिक असल्याने गुटखा विक्रेत्यांना आयतेच बळ मिळत आहे. शहराप्रमाणे आता ग्रामीण भागातही गुटखा विक्रेते सोकावले आहेत. सध्या तरी या विक्रीला अच्छे दिन आल्याचे दिसत आहे. ग्रामीण भागात तर चक्क किराणा दुकानांमध्ये देखील गुटखा सहजपणे उपलब्ध होत आहे. बंदी असलेला गुटखा खाणारेही बिनधास्त असून, सहजपणे ते कुठेही पिचकार्‍या टाकताना दिसतात. त्यामुळे महाराष्ट्र शासनाचा गुटखा बंदी कायदा निव्वळ फार्स ठरला आहे.

काही ठिकाणी तर उघडपणे गुटख्याची विक्री होते, तर काही ठिकाणी चोरी छुपे व्यवहार चालतात. अनोळखी माणसाला शक्यतो गुटखा दिला जात नाही, पण काही विक्रेते कुणाचाही मुलाहिजा न ठेवता सरसकट सर्वांना गुटखा विकतात. कधी काळी ५ रुपयाला मिळणारे गुटखा पाकीट अनेक महाभाग दुप्पट ते चौपट किंमत देऊन आनंदाने विकत घेत असल्याचेही पहावयास मिळते. या अशा परिस्थितीमुळे गुटखा विक्रेत्यांवर धाडी पडतात म्हणजे नेमके काय, व्यापार्‍यांना गुटखा पुरविणारे सूत्रधार मोकाट का, असे एक ना अनेक सवाल उभे राहत आहेत.


हे ही वाचा – चंद्रकांत पाटलांच्या इशाऱ्याला काँग्रेस गांभीर्याने घेत नाही, नाना पटोलेंचा घणाघात


 

First Published on: September 20, 2021 6:33 PM
Exit mobile version