घरताज्या घडामोडीचंद्रकांत पाटलांच्या इशाऱ्याला काँग्रेस गांभीर्याने घेत नाही, नाना पटोलेंचा घणाघात

चंद्रकांत पाटलांच्या इशाऱ्याला काँग्रेस गांभीर्याने घेत नाही, नाना पटोलेंचा घणाघात

Subscribe

सगळ्या प्रकारचे ब्लॅकमेल करण्याच कारस्थान केंद्र सरकार करत आहे.

दोन दिवसांमध्ये काँग्रेसच्या दोन मंत्र्यांच्या अडचणी वाढणार असल्याचा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. परंतु चंद्रकांत पाटील यांचा इशारा आम्ही गांभीर्याने घेत नाहीत असे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. केंद्रातील मोदी सरकार हे ब्लॅकमेलिंग करणारे सरकार आहे. केंद्र सरकार ज्याप्रमाणे माध्यमांना, उद्योगपतींना ब्लॅकमेल केले जाते त्याची प्रतिकृती आता महाराष्ट्रात दिसत असल्याचा घणाघात नाना पटोले यांनी केला आहे. कर नाही तर डर कशाला अशी महाविकास आघाडीची भूमिका असल्याचे नाना पटोले यांनी किरीट सोमय्यांच्या आरोपांवर म्हटलं आहे. आमच्यात दोष नसल्यामुळे आम्हाला आरोपाची भीती नसल्याचे नान पटोले यांनी म्हटलं आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या इशाऱ्याला गांभीर्याने घेत नाही असे म्हटलं आहे. नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी नाना पटोले यांनी म्हटलं आहे की, भाजपचे प्रदेशाध्यक्ष कोणावर कोणावर चौकशा लावायच्या याबाबतचे अधिकार केंद्रात बसलेल्या ब्लकमेलिंग करणाऱ्या सरकारन दिला आहे. मग ते माध्यमांना, उद्योगपतींना, राजकीय व्यवस्थेमध्ये ब्लॅकमेल करत आहेत. या सगळ्या प्रकारचे ब्लॅकमेल करण्याच कारस्थान केंद्र सरकार करत आहे. त्याचीच प्रतिकृती महाराष्ट्रात होताना दिसत असल्याचे नाना पटोले यांनी म्हटलं आहे. आम्हाला कोणत्याही इशाऱ्याला गांभीर्याने घेण्याचे कारण नाही. आमच्या मंत्र्यांवर आरोप लावले तरी मंत्र्यांचे कोणतेही दोष नसल्यामुळे त्यांच्या आरोपाची भीती नाही असेही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

लक्ष विचलित करण्याचा भाजपचा प्रयत्न

एकत्रित उत्तर देण्याचे कारण नाही. ते आरोप करत आहेत. ईडी आणि सीबीआयचा वापर करुन कसा दुरुपयोग केला जात आहे. सगळा देश पाहत आहे. त्यामुळे एखाद्याने ओरडावे आणि त्याच्याकडे पुर्ण लक्ष द्यावे अशा पद्धतीने कोणताही प्रयत्न नाही. कर नाही तर डर कशाला अशी महाविकास आघाडीची भूमिका आहे. त्याच्यामुळे या सगळ्या प्रश्नाला आणि जनतेच्या प्रश्नाला महाविकास आघाडी महत्त्व देते आहे. यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे.

चंद्रकांत पाटलांचा काँग्रेसला इशारा

अनेकांना असे वाटत आहे की, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आमदार सापडत आहेत. दोन काँग्रेसची नावे आले आहेत येत्या दोन दिवसांत त्यांचीही नावे जाहीर करण्यात येणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. आमच्या रडारवर अन्याय आहेत. आमच्या रडारवर भ्रष्टाचार आहे. महिलांना त्रास देणारे असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Kirit somaiya vs Hasan mushrif : दोन दिवसात दोन कॉंग्रेसच्या बड्या मंत्र्यांची पोलखोल – चंद्रकांत पाटील


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -