दिव्यांगाच्या मदतीला दिव्यांग आले धावून

दिव्यांगाच्या मदतीला दिव्यांग आले धावून

दिव्यांगाच्या मदतीला दिव्यांग आले धावून

रायगड जिल्ह्यात जुलै २०२१ मध्ये पडलेल्या मुसळधार पावसामुळे महाड,पोलादपूर तालुक्यातील पूरग्रस्त झालेल्या दिव्यांग बांधवांच्या मदतीला दिव्यांग संघटना ही धावून आली. त्यामुळे दिव्यांग बांधवांना दिव्यांग संघटनेने केलेली मदत पाहून तेथे उपस्थित नागरिकांनी संघटनेचे कौतुक केले आहे.पोलादपूर, महाड तालुक्यात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती.या पुरामध्ये इतर नागरिकसमवेत दिव्यांग बांधवांच्या कुटूंबयाची देखील वाताहत झाली होती.पूरग्रस्त नागरिकांना विविध संस्था,सामाजिक कार्यकर्ते यांनी ज्याचा त्यांच्या परीने प्रयत्न देखील केला आहे.

मदत ही सदृढ असा पूरग्रस्त नागरिकांना मिळाली मात्र दिव्यांग बांधवापर्यंत ती पोहचली नव्हती. त्यामुळे त्याचे आणि कुटुंबियांचे जगणे असह्य होत होते .याची माहिती महाराष्ट्र राज्य दिव्यांग शासकीय निमशासकीय कर्मचारी संघटना तथा रायगड जिल्हा दिव्यांग संघर्ष समितीचे अध्यक्ष साईनाथ पवार यांना याची माहिती भेटली.साईनाथ पवार यांनी महाड पोलादपूर येथील पूरग्रस्त दिव्यांग बांधवांची होणारी हाल याबाबतची माहिती महाराष्ट्र राज्य बेलदार भटका समाजाचे अध्यक्ष राजू साळुंके, आई फाउंडेशनचे उपाध्यक्ष सागर पवार, अपंग संघर्ष समितीचे शैलेश सोनकर यांच्या कानावर टाकली.दिव्यांग बांधव याना कोणाची मदत ही पुरेशा प्रमाणात मिळाली नाही म्हणून आपणच दिव्यांग बांधव हे दिव्यांगाच्या मदतीला गेले पाहिजे. त्यानंतरमहाराष्ट्र राज्य बेलदार भटका समाजाचे अध्यक्ष राजू साळुंके, आई फाउंडेशनचे उपाध्यक्ष सागर पवार, यांनी मोलाची मदत केली .त्याचप्रमाणे दिव्यांग बांधवांसाठी गुरुप्रीत सिंग या उद्योजकांनी ब्लॅंकेट,सतरंजी मदत दिली.राजू साळुंके यांनी अत्यावश्यक साहित्यामदत दिली.सदर मदत ही निव्वळ रायगड जिल्हयातील नव्हे तर रत्नागिरी जिल्हयातील खेड ,चिपळूण येथीलसुद्धा दिव्यांग बांधवांना मदत पोहच केली आहे.

साईनाथ पवार यांनी सांगितले की रायगड जिल्ह्यातील महाड पोलादपूर तालुक्यात पूरग्रस्त झालेल्या नागरीकांमध्ये दिव्यांग बांधवही होते.मात्र जेव्हा काही संस्था,सामाजिक कार्यकर्ते यांनी पूरग्रस्त याना मदत करण्यासाठी प्रयत्न केला मात्र यांनी दिव्यांग बांधवापर्यंत मदत पोहच केली नाही.दिव्यांग बांधव हा उपाशी राहील मात्र कोणापुढे हात पसरणार नाही.असाही विश्वास यावेळी पवार यांनी व्यक्त केला.दिव्यांग बांधवांच्या मदतीला महाराष्ट्र राज्य बेलदार भटका समाजाचे अध्यक्ष राजू साळुंके, आई फाउंडेशनचे उपाध्यक्ष सागर पवार, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मुलन संघर्ष समितीचे कोकण विभागीय अध्यक्ष अमूलकुमार भलगट यांनी मोलाचे सहकार्य केले आहे त्याबाबत त्यामुळे त्याचे आभार मानावे तितके कमी आहे.

-अमूलकुमार जैन,रेवदंडा


हेही वाचा – भाजप – मनसे एकत्रिपणे निवडणूका लढवण्याचा प्रस्ताव नाही – चंद्रकांत पाटील

First Published on: August 6, 2021 3:18 PM
Exit mobile version