मोहोपाडा तलावाजवळील परिसर हायमॅक्स दिव्यांनी प्रकाशमय

मोहोपाडा तलावाजवळील परिसर हायमॅक्स दिव्यांनी प्रकाशमय

मोहोपाडा तलावाजवळील परिसर हायमॅक्स दिव्यांनी प्रकाशमय

मोहापाडा तलावाजवळील परिसरात अनेक महिने अंधाराचे साम्राज्य होते. हेच अंधाराचे साम्राज्य दूर करण्यासाठी वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीकडून हायमॅक्स दिवे लावून परिसर प्रकाशमय केला आहे. या तलावाजवळील परिसरात पाणी साठवण टाकी, आरोग्य उपक्रेंद्र, तलावाकाठचे वासांबे आईचे मंदिर या सर्व गावातील गोष्टी इथे असूनदेखील परिसरात अंधारच होता. याशिवाय अंधार असल्या कारणाने  नागरिकांना विशेषतः महिलावर्गाला या परीसरातून जाताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता. याबाबत नागरिकांनी सरपंच ताई पवार व उपसरपंच राकेश खारकर यांना सदर समस्या सोडविण्याची मागणी केली होती.त्यानुसार वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायत सेस फंडातून मोहोपाडा तळावा जवळ पोलासह हायमॅक्स दिवे लावण्यात आले.
या हायमॅक्सचे उदघाटन सरपंच ताई पवार यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच राकेश खारकर, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य कृष्णा पारंगे,माजी सरपंच तथा विद्यमान सदस्या भाग्यश्री पवार, ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. मोहोपाडा तळावा जवळचा परिसर हायमॅक्स दिव्यांनी उजळल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

भारतीय बौध्द महासभेतर्फे पूरग्रस्तांना मदतीचा हात

भारतीय बौद्ध महासभेतर्फे रायगड जिल्ह्यातील महाड व पोलादपूर तालुक्यातील बाधितांना स्वतंत्र भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त जीवनावश्यक वस्तूंसह इतर साहित्याचे वाटप पोलादपूर तालुक्यातील कापडे सिध्दार्थ नगर तसेच महाड तालुक्यातील कुसगाव,टेमघर,महाड शहर येथे करण्यात आले.

रायगड जिल्हा अखिल गुरव समाज संघटनेच्यावतीने विविध कार्यक्रम 

अखिल गुरव समाज संघटना रायगड जिल्हा संघटनात्मक आढावा बैठक पार पडली. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.अतिवृष्टिमुळे चिपळून,महाड येथील दिवंगत तसेच कोरोना महामारीमध्ये दिवंगत झालेल्या सर्व बांधवांना श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी पत्रकार बाळू गुरव यांचा अखिल गुरव समाज संघटनेच्यावतीने कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.तर गुरव समाजाच्या २०२० – २०२१ ह्या शैक्षणिक वर्षात दहावी/बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन तसेच  ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेले सरपंच,सदस्य यांचे सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अॅड.आण्णासाहेब शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.


हेही वाचा – Afghanistan: काबुलहून C-17 विमान भारतीय राजदूतासह १२० लोकांना घेऊन गुजरातमध्ये दाखल


First Published on: August 17, 2021 1:15 PM
Exit mobile version