नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी

नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी सरकारने स्टार्स (STARS) हा प्रोजेक्ट तयार केला आहे. STARS म्हणजे Strengthening teaching learning and result for states असल्याचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. हा प्रोजेक्ट सहा राज्यांमध्ये राबवण्यात येणार असून त्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे.

शिक्षणापासून काय शिकले, हा मूळ उद्देश आहे. यासाठी अनेक कार्यक्रम चालविण्यात येतील. जागतिक बँकेच्या मदतीने हे 6 राज्यांत चालविले जाईल. STARS कार्यक्रम शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करेल. यामध्ये हिमाचल प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, केरळ आणि ओडिशा या सहा राज्यांचा समावेश आहे. या संपूर्ण प्रोजेक्टची किंमत 5,718 कोटी रुपये आहे. यामध्ये जागतिक बँकेची 500 मिलियन डॉलर्सची मदत होणार आहे, असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले.

याशिवाय, जम्मू-काश्मीर, लडाखसाठी विशेष पॅकेजला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन अंतर्गत सरकारने 520 कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. तसेच, मिनरल डेव्हलपमेंट कंपनी नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनएमडीसी) आणि नगरनार स्टील प्लांटच्या डीमर्जला सरकारने मंजुरी दिली आहे. डिमर्जर एप्रिलपर्यंत पूर्ण होईल, असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले.

First Published on: October 15, 2020 6:42 AM
Exit mobile version