Coronavirus:…तर इटलीत करोना पसरलाच नसता

Coronavirus:…तर इटलीत करोना पसरलाच नसता

...तर इटलीत करोना पसरलाच नसता

करोना विषाणुने चीनमध्ये थैमान घातल्यानंतर आता इटलीला आपल्या विळख्यात घेतले आहे. इटलीमध्ये दिवसरात्र केवळ अँबुलन्सचा आवाज येत आहे. इटलीमध्ये करोना विषाणुमुळे गेल्या २४ तासांत ६८०पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. आता इटलीच्या दक्षिण भागाकडे देखील हा विषाणू पसरत आहे. इटलीमध्ये इतर कोणत्याही देशांपेक्षा जास्त बळी गेले आहेत. ताज्या आकडेवारीनुसार, एका महिन्यात झालेल्या संक्रमणामुळे ७,५०३ लोकांचा मृत्यू झाला आहे. इटली जगातील सर्वोत्तम वैद्यकिय सेवा असणारा देश आहे. असे असताना देखील करोना एवढा वरचढ कसा ठरला? करोनाला तोंड देण्यासाठी इटली का तयार नव्हता?

चीनवरुन आलेल्या दोन पर्यटकांना करोना झाला होता. मात्र, त्याला साधा फ्लू असल्याचे ठरवले. हाच आत्मविश्वास इटलीला नडला. तज्ञांचे म्हणणे आहे की, करोना विषाणू इटलीमध्ये सापडण्यापूर्वी आठवडाभरापासून सर्वत्र संक्रमित झाला होता. सर्वजण आपआपले काम करत राहिले, चित्रपट पहायला गेले, पार्ट्या केल्या, स्टेडियमवर सामने बघायला गेले. यामुळे करोनाचा संसर्ग सर्वत्र पसरला.


हेही वाचा – Coronavirus: इटलीत करोनाचं थैमान; दिवसरात्र येतोय केवळ अँबुलन्सचा आवाज

जेव्हा अधिकृत आकडेवारीमध्ये ५,८३३ प्रकरणे आणि २३३ मृत्यू नोंदले गेले, तेव्हा इटलीचे प्रशासन खडबडून जागे झाले. लगेचच उपाययोजनांचा विचार करायला सुरुवात केली. इटलीमध्ये ९ मार्च रोजी काही भागात लॉकडाऊनची घोषणा करण्यात येणार होती. मात्र, ही बातमी एक दिवस आधीच समोर आली. त्यामुळे मिलानच्या रहिवाशांनी दुसऱ्या शहरात जाण्याची साधली, सोबत करोनाला पण सोबत घेऊन गेले. त्यामुळे करोना सहज देशभर पसरला.

इटालीची आरोग्य सेवा करोनाच्या हल्ल्यासाठी तयार नव्हती. अतिदक्षता विभागात आणि संसर्गजन्य रोग विभागांमध्ये पुरेसे मास्क, व्हेंटिलेटर, यांत्रिक व्हेंटिलेटर आणि बेड्स नव्हते. इटलीमध्ये १ लाख लोकांसाठी १२ बेड असे समीकरण होते. यामुळे प्रदर्शन हॉल, व्यायामशाळा, रस्त्यांच्या कडेला रुग्णांवर उपचार करावे लागत आहेत.


हेही वाचा – Coronavirus: लॉकडऊनने करोनाला रोखता येणार नाही…!

इटलीमध्ये करोनाचे ७४ हजार ३८६ रुग्ण आहेत. या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर्स आणि नर्स देखील करोनाचे शिकार होत आहेत. इटलीमध्ये गाऊन, ग्लोव्हज, मास्कची तीव्र कमतरता आहे. आम्हाला संसाधनांची आवश्यकता आहे. डॉक्टर सरकारला पत्र लिहून आम्हाला असे वाऱ्यावर सोडून न देण्याची विनंती करत आहेत. इटलीमध्ये सध्या कठिण काळ सुरु आहे. इटली त्यावेळीच जर सावध झाली असती तर आज इटलीवर ही वेळ आली नसती.

 

First Published on: March 26, 2020 4:22 PM
Exit mobile version