Covid-19 JN.1 Symtoms : नव्या व्हेरियंटमध्ये बदलली कोरोनाची लक्षणे? किती आहे धोकादायक

Covid-19 JN.1 Symtoms : नव्या व्हेरियंटमध्ये बदलली कोरोनाची लक्षणे? किती आहे धोकादायक

मुंबई – कोरोनाचे देशात सध्या 4,054 सक्रीय रुग्ण आहेत. यामधील सर्वाधिक केसेस केरळमधून समोर आल्या आहेत. भारतात सध्या कोरोनाचा सब व्हेरियंट JN.1 बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. देशात या नव्या व्हेरियंटचे 63 रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्रात मुंबईमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. मात्र JN.1 संक्रमित रुग्णांची संख्या राज्यात फक्त 10 आहे.

नवीन सब-व्हेरियंट JN.1 च्या केसेस वाढत असल्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना टेस्टिंग वाढवण्यास सांगितल्या आहेत. त्यासोबतच इन्फ्लूएंझा सारख्या आजारांवर विशेष लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे. एम्सचे माजी संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले, ‘नवीन सब-व्हेरियंट JN.1 सध्या हळूहळू पसरत आहे. मात्र याच्या संक्रमणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचे प्रमाण वाढलेले नाही.’ जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) माजी अधिकारी आणि शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या, ‘आम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे, मात्र सध्या चिंतेची बाब नाही. कारण आमच्याकडे अजून नव्या व्हेरियंटचा पुरेसा डेटा उपलब्ध नाही. त्यामुळे नवीन सब-व्हेरियंट JN.1 अधिक धोकादायक तथा गंभीर आहे की नाही, हे सध्याच सांगता येणार नाही.’

या नव्या JN.1 व्हेरियंटची लक्षणे काय आहेत, हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे. आणि सर्वसामान्यांना कसे कळेल की त्यांना इन्फ्लूएंझा आहे की नाही, किंवा ते JN.1 ने ते संक्रमित आहेत का?

JN.1 सब व्हेरियंटची लक्षणे

तज्ज्ञाचे म्हणणे आहे की, कोविड-19 च्या वेगवेगळ्या व्हेरियंटचे कारण हे लक्षणांमध्ये असणारे छोटे-मोठे बदल आहेत. कारण लोकांचे व्हॅक्सिनेशन झालेले आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचे शरीर आणि इम्यूनिटीच्या आधारावर लोकांमध्ये वेगवेगळी लक्षणे आढळून येऊ शकतात. सीडीसीने 8 डिसेंबर रोजी JN.1 वर चर्चा करताना एका रिपोर्टमध्ये म्हटले होते, ‘JN.1 किती गंभीर आहे, हे व्यक्तीची इम्युनिटी आणि ओव्हरऑल हेल्थवर आवलंबून आहे.’
इंग्लंडच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी नवीन डेटाच्या आधारावर म्हटले, की कोविड-19 ची नवीन लक्षणे समोर येत आहेत. त्यामध्ये
– सर्दी, वाहते नाक
– खोकला
– डोकेदुखी
– थकवा आणि अशक्तपणा जाणवणे
– मांसपेशींमध्ये दुखणे
– घसा खवखवणे
– झोप न येणे
– बेचैनी

इंग्लंडमधील डॉक्टरांचे म्हणणे आहे की, मागील हिवाळ्यात केलेल्या संशोधनानुसार, कोविड-19 आणि हिवाळ्यात होणाऱ्या इतर श्वसनाच्या आजारांची लक्षणे एकसारखी होती. खोकला, घशात खवखव, शिंका येणे आणि डोकेदुखी ही सर्वाधिक लक्षणांपैकी आहेत. लक्षणांच्या आधारावरच SARS-CoV-2, इन्फ्लूएंझा आणि RSV यातील अंतर सांगणे अवघड आहे. त्यामुळे टेस्टिंग करणे सर्वाधिक योग्य उपाय आहे.

हेही वाचा – Corona Update: दक्षिण भारतात कोरोना बॉम्ब फुटला, कर्नाटकात 3 जणांचा मृत्यू; मुंबई-महाराष्ट्रात रुग्णसंख्या दीडशेपार

First Published on: December 26, 2023 1:19 PM
Exit mobile version