मुंबईत पहिला दिवस शून्य कॉपीचा, तर राज्यभरात ८२ कॉपींची प्रकरणे

मुंबईत पहिला दिवस शून्य कॉपीचा, तर राज्यभरात ८२ कॉपींची प्रकरणे

राज्य शिक्षण मंडळाच्या एचएससी परीक्षेचा पहिला पेपर मंगळवारी सुरळीत पार पडला. गेल्या काही परीक्षांचा इतिहास लक्षात घेता पेपर व्हॉटस अ‍ॅपवर व्हायरल झाल्याने चिंतेत असलेल्या बोर्डाने परीक्षा सुरळीत पार पडल्यानंतर सुटकेचा निश्वास सोडला. राज्य विभागीय मंडळातर्फे यंदा पहिल्यांदाच रनर ही विशेष संकल्पना राबविल्याने त्याचा फायदा झाल्याचे दिसून आले आहे. तर दुसरीकडे राज्यभरात पहिल्या पेपर दरम्यान एकूण ८२ कॉपीचे प्रकरणे समोर आली असताना मुंबईत पहिला दिवस शून्य कॉपीचा आढळून आल्याने मुंबई विभागाने समाधान व्यक्त केले आहे.

परीक्षा केंद्रावर मोबाईल बंदी सक्तीची

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावी बोर्डाच्या परीक्षेस मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. गेल्या काही वर्षांचा इतिहास लक्षात घेता परीक्षे दरम्यान मोबाईलवर प्रश्नपत्रिका व्हायरल होण्याचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे बोर्डाने यंदा त्यांची गंभीर दखल घेत केंद्रीय पर्यवेक्षक आणि रनर ही संकल्पना प्रत्यक्षात आणत यातून सुटका करुन घेतली. त्यानुसार मंगळवारी इंग्रजी विषयाचा पेपर सुरळीत पार पडल्याचे राज्यभरात दिसून आले आहे. तर पेपर ही सोप्पा असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांकडून देण्यात आली आहे. मंगळवारी पहिल्या दिवशी जवळपास सर्वच परीक्षा केंद्रावर मोबाईल बंदी सक्तीची करण्यात आली होती. त्याची अंमलबजावणी देखील व्यवस्थेत पार पडली. तर संवेदनशील परीक्षा केंद्रावर पोलीस बंदबोस्त देखील दिसून आला होता. अनेक परीक्षा केंद्रावर पालकांची लगबग दिसून आली असून बोर्डाने पहिला पेपर सुरळीत गेल्याने सुटकेचा निश्वास सोडला आहे.

सर्वाधिक कॉपींच्या तक्रारी लातूरात

दरम्यान, राज्य शिक्षण मंडळाने व्यक्त केलेल्या कॉपीमुक्त परीक्षेचा निर्धारास यंदाही छेद मिळाल्याचे दिसून आले आहे. मुंबई आणि कोकण विभाग वगळता इतर सर्वच विभागीय मंडळात कॉपी झाल्याच्या तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. मुंबईत फक्त एका परीक्षा केंद्रावर विद्यार्थी उशीराने पोहचल्याने त्याला परीक्षा देता आलेली नाही. मुंबई आणि कोकणात शून्य कॉपी नोंदविण्यात आली असताना सर्वाधिक कॉपींच्या तक्रारी लातूर येथे आढळून आल्या असून लातूरात एकूण ३४ तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्यापाठोपाठ नाशिकमध्ये १८ कॉपींचे तक्रारींची नोंद करण्यात आली आहे.

यामध्ये मुंबई आणि कोकण विभाग वगळता इतर सर्वच विभागीय मंडळात कॉपी झाल्याच्या तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. पुणे विभागात ०६, नागपूर ०४, औरंगाबाद ०७, कोल्हापूर ०४, अमरावती ०९, नाशिक १८, तर लातूरमध्ये सर्वाधिक अशा ३४ तक्रारी करण्यात आल्या आहेत.

First Published on: February 18, 2020 8:42 PM
Exit mobile version