अलिबाग केंद्रीय पथकाकडून नियोजित वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी

अलिबाग केंद्रीय पथकाकडून नियोजित वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी

अलिबाग केंद्रीय पथकाकडून नियोजित वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी

राज्य सरकारने येथील वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्राकडे पाठविल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा सामान्य रुग्णालय आणि आरसीएफ वसाहतीला तीन सदस्य असलेल्या केंद्रीय पथकाने बुधवारी भेट देऊन पाहणी केली.
जिल्हा सामान्य रुगणाल भेटीत ओपीडी, अपघात विभाग, शस्त्रक्रिया कक्ष, आयसीयू, मेडिकल वॉर्ड, सर्जिकल वॉर्ड, प्रयोगशाळा, औषध भांडार, वैद्यकीय महाविद्यालय प्रशासकीय इमारत यांची एका पथकाने पाहणी केली. तर दुसर्‍या पथकाने आरसीएफ येथे तात्पुरते तयार करण्यात आलेले लेक्चर रूम, हॉस्टेल, वैद्यकीय अधिकारी निवासस्थान आणि इतर मेडिकल फॅकल्टी इमरतीची पाहणी केली. केंद्रीय पथकाच्या पाहणी दौर्‍यानंतर अहवाल केंद्राकडे सादर केला जाणार आहे. त्यानंतर नियोजित वैद्यकीय महाविद्यालयाला केंद्राकडून या वर्षात मंजुरी मिळणार का, याकडे आता रायगडकरांचे लक्ष लागले आहे.

तालुक्यातील उसर येथे ५२ एकर जागा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी राज्य शासनाने मंजूर केली आहे. तसेच ४०६ कोटींचा निधीही मंजूर केलेला आहे. उसर येथे महाविद्यालयाचे काम सुरू झाले नसले तरी तात्पुरते जिल्हा सामान्य रुग्णालय आणि आरसीएफ वसाहतीत महाविद्यालयाच्या अनुषंगाने लागणार्‍या सोयी-सुविधा उभारल्या जात आहेत. त्यामुळे पहिली तुकडी या वर्षात सुरू करण्याचा पालकमंत्री अदिती तटकरे यांचा मानस आहे.

जे. जे. रुग्णालयाचे डॉक्टर, नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी पथकाला माहिती दिली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यास रायगडकरांसाठी सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा जिल्ह्यातच मिळणार आहेत. यासाठी मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांतून उपचारासाठी जाण्याच्या समस्येतून सुटका होणार आहे.


हेही वाचा – उत्कृष्ट तपासासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून गौरव; पोलीस अधीक्षक सुनील कडासनेंसह ११ अधिकार्‍यांना युनियन होम मिनिस्टर पदक

First Published on: August 12, 2021 8:33 PM
Exit mobile version