काशिद पूल वाहतुकीसाठी खुला

काशिद पूल वाहतुकीसाठी खुला

काशिद पूल वाहतुकीसाठी खुला

मुरुड तालुक्यातील काशिद पूल आजपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. आज २ ऑगस्टपासून या पुलावरुन हलक्या वाहनांची वाहतूक सुरू करण्यात आली आहे. २ दिवसांनंतर अवजड वाहनांची देखील वाहतूक सुरु होईल, अशी माहिती तहसिलदार गमन गावित यांनी दिली आहे. अलिबाग मुरुडचे आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते आज मुरुड तालुक्यातील काशिद येथे नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या पुलाचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला.
अलिबाग-मुरुड रस्त्यावरील काशिद बीच ते काशिददरम्यानचा ५० वर्षे जुना पूल ११ जुलैच्या रात्री अतिवृष्टीच्या तडाख्यात कोसळला होता. या दुर्घटनेमध्ये विजय गोपाळ चव्हाण  यांना आपला जीव गमवावा लागला होता. तर ६ जण बालंबाल बचावले होते. आज २१ दिवसांनंतर काशिद पूल वाहतूकीसाठी खुला करण्यात आला आहे. आजपासून हलक्या वाहनांची वाहतूक सुरु झाली असून, दोन दिवसानंतर अवजड वाहतूकदेखील सुरु होईल, असे मुरुडचे तहसिलदार गमन गावित यांनी कळवले आहे.
११ जुलै २०२१ रोजी मुसळधार पावसामुळे काशीद पूल दुर्घटना घडली होती. ही घटना दुर्देवी होती. या दुर्घटनेमध्ये एकाचा निष्पाप बळी गेला होता. सदर पूल दुर्घटनेमुळे बोर्ली-मांडला विभागातील नागरिकांचा मुरुडचा संपर्क तुटला होता.त्यांना मुरूड येथे जायचे असेल तर जवळपास चाळीस किलोमीटरचा वळसा मारून सुपेगाव खिंडीतुन मुरूड येथे जावे लागत होते. तशीच अवस्था ही मुरुडकारांची देखील झाली होती.सदर पुलाचे काम तातडीने करण्यात यावे अशी सूचना शासनाच्या वतीने अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले होते.त्यानुसार त्यांनी तत्परतेने  पूर्ण करीत उत्कृष्ट काम पुलाचे केले आहे. पुलाचे काम सुरू असताना काशीद ग्रामस्थांसहित तालुक्यातील नागरिकांनीही संयम दाखवीत सहकार्य केले.त्यांनीही दाखविलेल्या सहकार्यामुळे त्यांचे कौतुक केले. त्यामुळे शासनाच्या वतीने त्यांना धन्यवाद जितके देऊ तितकेच कमी आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. या पुलावरून टप्प्याटप्प्याने वाहतूक सुरू करण्यात येणार असल्याचे अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता राहुल मोरे यांनी यावेळी सांगितले.
                                                                                                                -अमूलकुमार जैन

हेही वाचा – पंतप्रधान मोदींनी आज e-RUPI केले लाँच, अडथळ्यांशिवाय घेता येईल अनेक योजनांचा फायदा


First Published on: August 2, 2021 6:15 PM
Exit mobile version