Surya Grahan 2021: आज वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण, कधी, कुठे आणि कसे पहाल?

Surya Grahan 2021: आज वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण, कधी, कुठे आणि कसे पहाल?

आज वर्षातील शेवटचं सूर्य ग्रहण आहे. या आधी १० जून २०२१ ला वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण लागलं होतं. आज अंटार्टिकामध्ये सूर्य ग्रहण पूर्णपणे दिसेल. २०२१मधील हे दुसरे आणि शेवटचे सूर्य ग्रहण आहे. आजचं सूर्य ग्रहण भारतातून दिसणार नाही त्यामुळे सूतक पाळण्याची गरज नाही. आज सूर्य ग्रहणाच्या मुहूर्तावर शनि अमावस्या देखील आली आली आहे. सूर्य ग्रहण आणि शनि अमावस्येचा हा योग बऱ्याच वर्षांनी एकत्र आला आहे. वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण आज ४ डिसेंबरला सकाळी ११ वाजता सुरू होणार आहे. सूर्य ग्रहण भारतातून दिसणार नाही मग सूर्य ग्रहण पाहण्यासाठी काय करायचं जाणून घ्या.

इथे दिसणार सूर्य ग्रहण

वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण आज दक्षिण आफ्रीका, दक्षिण ऑस्ट्रेलिया,दक्षिण अमेरिका,प्रशांत महासागर,अटालांटिक महासागर, हिंदी महासागर येथे दिसणार आहे.

सूर्यग्रहणाची वेळ

सूर्यग्रहण हे ४ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी १०:५९ मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुपारी ३ वाजून ७ मिनिटांनी संपणार आहे. संपूर्ण ग्रहणाचा कालावधी हा ८ तासांचा असेल.

सूर्यग्रहण कुठे पहाल?

वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. त्यामुळे सूर्यग्रहण पाहण्यासाठी स्काईवॉचर्स नासाच्या पेजवर लाइव्ह प्रेक्षपण तुम्ही पाहू शकता. त्याचप्रमाणे नासाच्या यूट्यूब चॅनेलवर देखील सूर्य ग्रहण लाइव्ह पाहता येईल.


हेही वाचा – 2022 love life- 2022 मध्ये ‘या’ राशीवाल्यांची लव्ह लाईफ असेल फार्मात

First Published on: December 4, 2021 10:56 AM
Exit mobile version