घरभक्ती2022 love life- 2022 मध्ये 'या' राशीवाल्यांची लव्ह लाईफ असेल फार्मात

2022 love life- 2022 मध्ये ‘या’ राशीवाल्यांची लव्ह लाईफ असेल फार्मात

Subscribe

चांगली नोकरी, घर , गाडी याशिवाय जर व्यक्तीला अजून काही हवं असंत तर तो आहे योग्य जोडीदार. ज्याच्याबरोबर आयुष्य व्यतीत करण्याचे त्याचे स्वप्न असतं. पण तसा जोडीदार प्रत्यक्ष भेटणं  अवघडचं. मात्र हे नवीन वर्ष अशाच योग्य जोडीदारांच्या शोधात असणाऱ्यांसाठी पर्वणी ठरणार आहे. कारण या वर्षी अनेकांना त्यांचा मनाजोगा जोडीदार भेटणार आहे. तर काहींचे लग्नाचे स्वप्नही पूर्ण होणार आहे.

मेष– मेष राशीवाल्यांसाठी २०२२ हे वर्ष लव्ह लाईफसाठी उत्तम आहे. चांगली गर्लफ्रेंड किंवा ब्वॉयफ्रेंडच नाही तर यावर्षी मेषवाल्यांना उत्तम पती पत्नीदेखील लाभणार आहेत. तर विवाहीत जोडप्यांमध्ये थोड्या कुरबुरी वाढतील.
पण चर्चेतून त्या मिटतील.

- Advertisement -

वृषभ–या राशीवाल्यांना जोडीदाराची उत्तम साथ लाभणार आहे. तसेच ज्या व्यक्ती जोडीदाराच्या प्रतिक्षेत आहेत त्यांची प्रतिक्षा यावर्षी संपणार आहे. या राशीवाल्यांच्या आयुष्यात पार्टनरची एन्ट्री अगदी अनपेक्षितपणे होणार आहे.

मिथुन-मिथुन राशीवाल्यांसाठी हे वर्ष प्रेमसंबंधासाठी उत्तम आहे. ज्या व्यक्ती खऱ्या प्रेमाच्या शोधात असतील त्यांचा शोध यावर्षी थांबणार आहे. मनाजोगता जोडीदार यावर्षी मिथुनला लाभणार आहे.

- Advertisement -

कर्क- कर्क राशीवाल्यांसाठी नववर्षाच्या पहील्या तीन महिन्यात चांगल्या घटना घडणार आहेत. जोडीदाराबरोबर चांगले संबंध दृढ होतील. अविवाहीतांना विवाह योग आहे.

सिंह- सिंह राशीवाल्यांना यावर्षी विवाहाचा योग आहे. जर तुम्ही प्रेमसंबंधात असाल तर एप्रिलनंतर लग्नाचा विचार कराल. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात जोडीदाराबरोबर वाद वाढण्याची शक्यता आहे.

कन्या- कन्या राशीवाल्यांसाठी हे वर्ष उत्तम असणार आहे. मात्र वर्षाच्या सुरुवातीला सतर्क राहणे गरजेचे आहे. फसवणूक होण्याची शक्यता आहे. सिंगल असणाऱ्यांना प्रिय व्यक्ती भेटणार आहे.

तूळ- प्रेमसंबंधात गंभीर असलेले लव्ह पार्टनर यावर्षी लग्नाच्या बंधनात अडकतील. वैवाहीक आयुष्य आनंदाचे असेल.

वृश्चिक-वृश्चिक राशीवाल्यांसाठी नवीन वर्ष खास असणार आहे. प्रेमसंबंधात वर्षाच्या सुरुवातीला काही वाद निर्माण होतील. पण सामंजस्याने वाद निवळतील. मनासारखा जोडीदार लाभणार आहे.

धनु- धनु राशीवाल्यांना यावर्षी प्रिय व्यक्तीबरोबर निवांत वेळ घालवता येईल. रखडलेली कामे मार्गी लागतील. अपेक्षित स्थळ येतील.

मकर- मकर राशीवाल्यांसाठी हे वर्ष संमिश्र आहे. लव्ह लाईफ मध्ये वाद विवादाची शक्यता आहे. पण वेळेनुसार वाद मिटतील. संयम बाळगावा लागेल. जर तुम्ही प्रेमसंबंधामध्ये असाल तर आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर बोलताना शब्द जपून वापरा.

कुंभ– कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हे वर्ष साधारण असेल. एप्रिल महिन्यात प्रिय व्यक्तीबरोबर वाद संभवतात. पण त्यामुळे निराश होण्याचे कारण नाही. कारण तुम्ही तुमच्या खास शैलीतून त्यांचे मन पुन्हा जिंकू शकता.

मीन- मीन राशीवाल्यांचे प्रेमसंबंध यावर्षी अधिकच बहरणार आहेत. पण मे महिन्यात गैरसमजुतीतून पार्टनरबरोबर वाद होतील. अशावेळी वाद अधिक न ताणता सामंजस्याने मिटवाल.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -