Dussehra Melava 2021 Live Update: धारावीतील लोकांचं पुनर्वसन करून जागतिक दर्जाचं आर्थिक केंद्र उभारणार – उद्धव ठाकरे

Dussehra Melava 2021 Live Update: धारावीतील लोकांचं पुनर्वसन करून जागतिक दर्जाचं आर्थिक केंद्र उभारणार – उद्धव ठाकरे
धारावीतील लोकांचं पुनर्वसन करून जागतिक दर्जाचं आर्थिक केंद्र उभारणार
मुंबईत लष्कराचं संग्रहालय उभं करणार – ठाकरे
एकतर्फी प्रेमासारखं महाराष्ट्रावर अॅसिड फेकतायत – उद्धव टाकरे
चीनमधून बाहेर पडणाऱ्या कंपन्या महाराष्ट्रात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. – उद्धव ठाकरे
मोदी सरकार केंद्रात आल्यानंतर गुजरातला सर्वाधिक निधी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
गुजरातच्या मुंद्रा पोर्टवरही ड्रग्ज सापडले त्यावर का नाही बोलत – उद्धव ठाकरे
महाराष्ट्रातय ड्रग्ज सापडत आहे असं नाही, मग महाराष्ट्राशी नतद्रष्टपणा का? – उद्धव ठाकरे
हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
केंद्र सरकार इतकेच राज्य सरकारला अधिकार – उद्धव ठाकरे
अमृत महोत्सवावर अमृत मंथन करा – उद्धव ठाकरे
महाराष्ट्रात जर लोकशाहीचा खून झाला तर काय उत्तर प्रदेशमध्ये लोकशाहीचा मळा फुलला आहे का? – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
ठाणेकरांनी नवरात्री रक्तदान करून विक्रम केला. यानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, ‘रक्तदान हा सुद्धा धर्म आहे.’
माझा देश हाच माझा धर्म – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
काही दिवसांपूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी वादग्रस्त वक्तव केले होते. यासंदर्भात उद्धव ठाकरे म्हणाले की, तुमची सावरकरांचे नाव घेण्याची लायकी आहे का?
‘हर हर महादेव काय असतं’ हे दिल्लीच्या तख्याताला दाखवायची वेळ येऊ नये – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
ममता दीदींना आणि बंगाल जनतेला मी धन्यवाद आणि अभिनंदन करतो – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
सत्तेचं व्यसन हे अंमली प्रकार आहे. या अंमली प्रकारचा बंदोबस्त कोण करणार? – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
क्रम दरिद्रे आमचे विचार नाही – उद्धव ठाकरे
अंगात धमक असेल तर अंगावर या, ईडी आणि सीबीआयची मदत घेऊ नका  – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही, आणि कोणी आलं तरी त्याला सोडत नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
माझं भाषण संपल्यावर काही जण चिरकणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला आहे. ते म्हणाले की, ‘मी पुन्हा येणारे म्हणणारे आता म्हणतायंत मी गेलोच नाही.’
आपला आवाज कधी कोणी दाबू शकत नाही आणि आवाज दाबणार कोणी जन्माला येऊ शकत नाही, असा जोरदार टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्याच्या सुरुवातीला लगावला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून शस्त्रांचे पूजन केले.
शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला सुरुवात झाली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटुंबियांसहित षण्मुकानंद सभागृहात पोहोचले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यासाठी रवाना झाले आहेत. षण्मुकानंद सभागृहात थोड्यात वेळात शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला सुरू होणार आहे.
कोल्हापूरचा शाही दसरा सोहळ्याला सुरुवात झाली. मानाच्या दुसऱ्या पालखीच आगमन झाले आहे.
किरीट सोमय्या यांच्याकडून भ्रष्टाचाराच्या रावणांचे दहन
नवघर पोलीस किरीट सोमय्या यांच्या कार्यालयात गेले असून त्यांनी किरीट सोमय्या यांना नोटीस बजावली आहे. यावेली पोलीस आणि सोमय्या यांच्यात बाचाबाची झाली. पोलिसांनी सोमय्या यांना १४४ ची नोटीस बजावली आहे. नोटीसमधील काही मुद्द्यांवर किरीट सोमय्यानी संपात व्यक्त केला आहे.
सध्या राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था पाहता १२ डिसेंबरला ऊसतोड कामगारांशी संवाद साधणार – पंकजा मुंडे
पंकजाताई घरात आहेत म्हणून काही जण खूश आहेत. तुम्ही विरोधाच असताना किती त्रास दिला – पंकजा मुंडे
सामान्य माणसाच्या विकासासाठी काम करायचे आहे – पंकजा मुंडे
भगवान भक्तीगडावरुन पंकजा मुंडेंचा जनतेशी संवाद साधत आहेत.  तुमच्या प्रेमासाठी माझी झोळी कमी पडली. दसऱ्याची परंपरा कायम ठेवण्यासाठीचे श्रेय जनतेलाच. देशात असा रांगडा सोहळा कुठेच होत नसेल – पंकजा मुंडे
पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर दर्शनासाठी दाखल झाल्या आहेत.गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे त्यांनी दर्शन घेतले आहे.
जामखेडमधील शिवपट्टण किल्ल्यावर ७४ मीटर उंच भगवा फडकवण्यात आला आहे. आमदार रोहित पवार यांच्या कल्पनेतून देशातील सर्वात उंच भगवा ध्वज फडकवण्यात आला आहे.
दोन राज्यांमधील पोलीस यंत्रणा आपआपसात का भिडते? – मोहन भागवत
स्वकीयांचा विसर पडल्याने भेदभाव वाढला आहे. त्याग आणि बलिदानामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यांसाठी अनेकांनी बलिदान दिले आहे. कालांतराने स्वचं विस्मरण झाले. हरवलेली एकात्मता मिळावायची असेल तर नव्या पिढीने इतिहास जाणून घ्यावा. मनातील भेदभावाची भावना बदलायला हवी. समाजाला तोडणारी नाही तर जोडणारी भाषा वापरायला हवी. जाती, धर्मातील भेद नष्ट व्हावे. शत्रूता, भेद याची पुवरावृत्ती नको – सरसंघचालक मोहन भागवत
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आज ९६ वा स्थापना दिवस होता. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वयंसेवकांच्या उपस्थितीत ८ वाजता विजयादशमीनिमित्त शस्रपूजन केले. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी संघाचे संस्थापक डॉ. हेगडेवार व द्वितीय सरसंघचालक दिवगंत गोळवलकर गुरुजी यांना श्रद्धांजली वाहिली. आज शिवसेनेचा दसरा मेळावा माटुंग्याच्या षण्मुखानंद सभागृहात सायंकाळी ६ वाजता होत असून या मेळाव्यातून शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विविध मुद्यांवरून भाजपला आणि केंद्रीय एजन्सीजना लक्ष्य करण्याची शक्यता आहे. ५० टक्के उपस्थितीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मेळाव्याला मार्गदर्शन करणार असल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
First Published on: October 15, 2021 7:36 PM
Exit mobile version