Live Update: गोव्यात २४ तासांत १,६४७ नव्या रुग्णांची वाढ, ३९ जणांचा मृत्यू

Live Update: गोव्यात २४ तासांत १,६४७ नव्या रुग्णांची वाढ, ३९ जणांचा मृत्यू
गोव्यात २४ तासांत १ हजार ६४७ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर २ हजार ६९३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. गोव्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ४४ हजार ८३९वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत २ हजार ३४१ जणांचा मृत्यू झाला असून १ लाख २४ हजार २५५ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
परभणीत ऑक्सिजन प्लँटमध्ये एअर पाईपचा स्फोट झाला. घटनेत कोणतीही जीवितहानी नसून जिल्हाधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
रायगडच्या समुद्रकिनारी २ दिवसांत ५ मृतदेह आढळले. यातील अलिबाग तालुक्यातील शनिवारी ४ मृतदेह, मुरुड येथे शुक्रवारी १ मृतदेह आढळला. मृतदेह सुमुद्रातून वाहून आल्याची माहिती
राहुल गांधी २५ मे रोजी हिंगोलीत राजीव सातव गावी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी येणार आहेत. काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांचे १६ मे रोजी पुण्यातील जहांगीर रुग्णालयात मृत्यू झाला. राजीव सातव आणि राहुल गांधी यांचे फार जिव्हाळ्याचे संबंध होते. राजीव सातव यांच्या अंत्यविधीला राहुल गांधी उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे २५ मे रोजी हिंगोलीत येऊन राजीव सातव यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत.
Barge P305च्या बेपत्ता कर्मचाऱ्यांना शोधण्यासाठी नौदलाकडून डायव्हिंग टीम तैनात करण्यात आली आहे. ही टीम मुंबई किनाऱ्याहून सकाळी  रवाना झाल्याची माहिती नौदलाच्या प्रवक्त्यांनी ट्विटद्वारे दिली आहे.
गेल्या २४ तासात देशात २०.६६ लाखांहून अधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. भारतात पुन्हा एकदा एका दिवसात सर्वाधित कोरोना चाचण्या करण्याचा नवीन विक्रम नोंदवण्यात आला आहे,अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
ज्येष्ठ संगीतकार रामलक्ष्मण यांचे निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. राम कदम आणि विजय पाटील या जोडीने अनेक सिनेमांना संगीत दिले. १९७७मध्ये राम यांचे निधन झाले. त्यानंतर विजय यांनी रामलक्ष्मण नावाने संगीत द्यायाला सुरुवात केली होती. पांडू हवालदार,आली अंगावर, राम राम गंगाराम, मैने प्यार किया, हम आपके है कोन,हम साथ साथ हे अशा ७५ सिनेमे त्यांनी संगितबद्ध केले.
  मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना हायकोर्टाने अकटेपासून तूर्तास दिलासा दिला आहे. राज्य सरकार आणि माजी पोलीस आयुक्त परबीर सिंह यांच्यात काय बिनसले आहे हे जाणून घेण्यात आम्हाल रस नाही. त्या पत्रानंतर परबीर सिंह यांच्यावर एकामागोमाग एक गुन्हे कसे दाखल झाले याचे आम्हाला उत्तर द्या असा सवाल हायकोर्टाने सरकारला विचारला आहे.
  देशात गेल्या २४ तासात २ लाख ५७ हजार २९९ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ३ लाख ५७ हजार ६३० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ४ हजार १९४ जणांचा देशात मृत्यू झाला आहे. देशात सध्या २९ लाख २३ हजार ४०० अँक्टिव्ह रुग्ण आहेत.
कल्याण ग्रामीणमधील हेदुसन गावात शॉर्ट सर्किटमुळे महावितरणाच्या भूमिगत केबलला आग लागली. अचानक आग लागल्याने गावात एकच गोंधळ उडाला. डोंबिवली एमआयडीसी फायर ब्रिगेडच्या टीमला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
First Published on: May 22, 2021 9:29 PM
Exit mobile version