Live Update : कल्याणमध्ये ७ नंतरही प्रवाशांना दिले तिकीट, नियमांचे उल्लंघन

Live Update : कल्याणमध्ये ७ नंतरही प्रवाशांना दिले तिकीट, नियमांचे उल्लंघन

मुंबई लोकल ट्रेन

कल्याणमध्ये ७ नंतरही सामान्य प्रवाशांना तिकीट देणे सुरु आहे. कल्याण रेल्वेकडून नियमांचे उल्लंघन झाले आहे. नियमानुसार प्रवाशांना सकाळी ७ नंतर तिकीट देता येणार नाही मात्र कल्याण स्थानकात ७ नंतरही तिकीट मिळत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.


विराट कोहलीला आऊट कसे करावे हाच मोठा प्रश्न, इग्लंडला विराटची भीती

विराट कोहलीला आऊट कसे करावे हा प्रश्न पडला असल्याचे मोईन अलीने म्हटले आहे. कारण विराट कोहलीची कोणतीही कमजोरी नाही असे मला वाटत आहे. इंग्लंडची गोलंदाजी उत्तम असून आमच्याकडे वेगवान गोलंदाज आहेत. असे मोईन अलीने म्हटेल आहे. विराट माझा चांगला मित्र आहे. परंतु आम्ही क्रिकेटविषयी बोलत नाही असेही मोईन अलीने म्हटले आहे.

‘फडणवीस सरकारने त्रास दिला तर महाविकास आघाडीने न्याय दिला’

‘फडणवीस सरकारने मला खूप त्रास दिला. तर महाविकास आघाडी सरकारने मला न्याय दिला’, असा खळबळजनक गौप्यस्फोट प्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी केला आहे. अहमदनगर जिल्ह्यात एका कार्यक्रमात ते बोलत त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. संत वामनभाऊ आणि भगवानबाबा प्रतिष्ठानच्यावतीने तात्याराव लहाने यांना सामजभूषण पुरस्कार देण्यात आला. त्यावेळी दिलेल्या भाषणात त्यांनी फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. त्यांच्या या आरोपामुळे संपूर्ण परिसरात एकच चर्चा रंगली.


मुंबईची लाईफ लाईन असलेली लोकल १ फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी सुरू होत आहे. रेल्वेने सर्वसामान्य प्रवाशांसाठी वेळेचे बंधन घातले आहे. सकाळी ७ ते दुपारी १२ आणि दुपारी ४ ते रात्री ९ ही वेळ सोडून उर्वरित वेळेत सर्वांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. मात्र, या वेळेशिवाय अन्य वेळेत तुम्ही लोकल प्रवास करत असाल तर तुम्हाला तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते, असे रेल्वे विभागानेच तसे जाहीर केले आहे.

आजपासून लोकलचे दरवाजे सर्वांना खुले!


देशद्रोहाचा सरकारी खेळ!

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात देशभर विशेषत: दिल्लीत शेतकर्‍यांचं आंदोलन सुरू झाल्यापासून देशद्रोहाचं वारं वाहू लागलं आहेत. आजवर असे गंभीर गुन्हे देशाच्या सुरक्षा आणि अखंडतेला बाधा पोचवणार्‍यांविरोधी लावले जायचे. आता ते आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांविरोधी, त्यांना समर्थन देणार्‍या म्हणजेच सरकारच्या भूमिकेला विरोध करणार्‍यांविरोधात लावले जात आहेत. मग त्यात कन्हैया कुमार असेल, जिग्नेश मेवाणी, शेहला राशीद, हार्दिक पटेल अशा चळवळीत सहभाग घेणार्‍या तरुणांवरही लावले जात आहेत.

देशद्रोहाचा सरकारी खेळ!

First Published on: February 1, 2021 7:30 AM
Exit mobile version