Karjat : भूमिपुत्रांना रेल्वेत नोकरी द्या, जितेंद्र पाटील यांची मागणी

Karjat : भूमिपुत्रांना रेल्वेत नोकरी द्या, जितेंद्र पाटील यांची मागणी

Karjat : भूमिपुत्रांना रेल्वेत नोकरी द्या, जितेंद्र पाटील यांची मागणी

कर्जत तालुक्यातील भिवपुरी रोड स्थानक परिसरात रेल्वे प्रशासनाने कारशेड उभारण्याचे ठरविले असून, यासाठी मोठ्या प्रमाणात स्थानिक शेतकऱ्यांची जमीन बाधित होणार आहे. शेतीप्रधान तालुक्यातील शेतकरी आपल्या जमिनी देऊन भूमीहिन होणार असल्यामुळे जमिनीचा योग्य मोबदला आणि शेतकऱ्यांच्या मुलांना रेल्वेत नोकरी मिळावी, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी केली आहे. रेल्वे प्रशासनाकडून दोन दिवसांपूर्वी जागेचा सर्व्हे करण्यात आला आहे. जर रेल्वे प्रशासाने प्रकल्पबांधित शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला, तसेच त्याच्या मुलाला रेल्वेत सामावून घेतले नाही आणि जबरदस्तीने जमीन हस्तांतरण प्रक्रिया सुरू केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या शेतकर्यांच्या पाठीशी खंबीर उभी राहील, यातून उभ्या राहणार्या संघर्षाला जशास तसे उत्तर दिले जाईल, अशा इशारा देखील त्यांनी रेल्वे प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला आहे.

भिवपुरी रोड रेल्वे स्थानक परिसरातील भूमीहिन शेतकऱ्यांना त्यांचा जमिनीचा योग्य मोबदला आणि मुलांना नोकरीत सामावून घेणे गरजेचे आहे. निवेदन दिल्यानंतर तशा प्रकारे सकारात्मक प्रतिसाद रेल्वे अधिकार्यांकडून मिळालेला आहे. तरीही जोपर्यंत योग्य मोबदला आणि नोकरी मिळणार नाही तोपर्यंत जमिनी मिळणार नाहीत.
– जितेंद्र पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना तथा रायगड
जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना


हे ही वाचा – Jammu Kashmir Encounter: राजौरीत दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत लष्कराच्या अधिकाऱ्यांसह ५ जवान शहीद


 

First Published on: October 11, 2021 2:46 PM
Exit mobile version