मोरा सागरी पोलीस ठाण्याची नवीन इमारत उद्घाटनापूर्वीच अडगळीत

मोरा सागरी पोलीस ठाण्याची नवीन इमारत उद्घाटनापूर्वीच अडगळीत

मोरा सागरी पोलीस ठाण्याची नवीन इमारत उदघाटनाआधीच भंगारात

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियोजन शुन्य कारभारामुळे ८५ लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेली नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील मोरा सागरी पोलीस ठाण्याची नवी इमारत उदघाटना आधीच भंगारात निघाली आहे. या दुर्लक्षापायी शासनाकडून खर्च करण्यात आलेला ८५ लाखांचा निधी बुडीत जातो की काय असा प्रश्न उरणच्या आम जनतेला पडला आहे. सागरी किनारपट्टी भागातून होणारे दहशतवादी कारवायांवर निगराणी ठेवण्यासाठी आणि देशातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शासनाने किनारपट्टी वरील सागरी पोलीस ठाण्यांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे. त्या अनुषंगाने मुंबई शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या मोरा, करंजा बंदर आणि घारापुरी परिसरावर नजर ठेवण्यासाठी शासनाने नवीमुंबई पोलीस आयुक्तांच्या हद्दीत नव्याने मोरा सागरी पोलीस ठाण्याची निर्मिती केली. प्रस्तावित मोरा पोलीस ठाण्यासाठी सुसज्ज इमारत असावी, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उरण शहरातील पेन्शनर पार्क येथील भूखंडावर शासनाकडून प्राप्त झालेल्या ८५ लाख निधीतून सुसज्ज इमारतीचे बांधकाम २०१८ ते २०२० या काळात हाती घेण्यात आले.

परंतु सदर पोलीस ठाण्याच्या इमारतीच्या छताला पावसाळ्यात गळती लागली आहे. शहरात उद्भभवणार्‍या पुराचे पाणी या इमारतीच्या तळमजल्यापर्यंत पोहेतचत असते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियोजन शुन्य कारभारामुळे उद्घाटना अगोदरच सदर इमारत भग्नावस्थेत पडून आहे. राज्यातील जनतेचा पैसा वाया जातो की काय अशी चर्चा सध्या उरणमध्ये रंगू लागली आहे. राज्य शासनाने मोरा सागरी पोलीस ठाण्याच्या नव्या इमारतीसाठी ८५ लाखांचा निधी २०१८ मध्ये मंजूर करुन दिला.परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियोजन शुन्य कारभारामुळे उद्घाटना अगोदरच इमारतीच्या छताला पावसाळ्यात गळती लागली आहे. इमारतीचे काम करणार्‍या संबंधित अभियंता आणि ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी उरणकर करत आहेत.

इमारतीच्या बांधकामासाठी वाया जात असलेला निधी शासनाने अभियंता व सदर ठेकेदारांकडून वसूल करून घ्यावा, त्याशिवाय शासकीय कामातील हयगयपणाची दखल घेतली जाणार नाही – जयवंत कोळी मा.सरपंच हनुमान कोळीवाडामोरा सागरी पोलीस ठाण्याच्या इमारतीच्या बांधकामासाठी ८५ लाखांचा निधी मंजूर झाला होता.परंतु इतर कामे ही निधी अभावी रेंगाळत पडली आहेत. शासनाकडून निधी मंजूर झाला की उर्वरित काम हाती घेतले जाईल,अशी माहित उरणमधील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एस. बी. बांगर यांनी सांगितले.

                                                                                                  – उरण / राजकुमार भगत


हेही वाचा – अक्षयच्या 300 कोटी बिग बजेट ‘सूर्यवंशी’ सिनेमाला ओटीटीवर मिळाली फक्त 50 कोटींची ऑफर


 

First Published on: August 26, 2021 1:28 PM
Exit mobile version