घरमनोरंजनअक्षयच्या 300 कोटी बिग बजेट 'सूर्यवंशी' सिनेमाला ओटीटीवर मिळाली फक्त 50 कोटींची...

अक्षयच्या 300 कोटी बिग बजेट ‘सूर्यवंशी’ सिनेमाला ओटीटीवर मिळाली फक्त 50 कोटींची ऑफर

Subscribe

कोरोना व्हायरसच्या काळात रिलीज झालेला अक्षयचा प्रत्येक सिनेमा काही खास कमाल दाखवू शकला नाही. याचप्रमाणे 'बेलबॉटम' देखील पूरता आपटला

बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारचा (akshay kumar )’बेलबॉटम'(bellbottom) सिनेमाला चाहत्यांची तसेच समिक्षकांची तुफान पसंती मिळत आहे. मात्र बॉक्स ऑफिसवर गल्ला जमवण्यात ‘बेलबॉटम’ला यश मिळाले नाही. कोरोना व्हायरसच्या काळात रिलीज झालेला अक्षयचा प्रत्येक सिनेमा काही खास कमाल दाखवू शकला नाही. याचप्रमाणे ‘बेलबॉटम’ देखील पूरता आपटला. सिनेमाला पाच दिवसात फक्त 20 कोटींची कमाई करण्यात यश आले आहे. आता बॉलिवूडचा स्वघोषीत समिक्षक कमाल आर खान (kamal r khan)उर्फ केआरके(krk) याने अक्षयबद्दल केलेलं ट्विट सध्या चर्चेचा विषय बनत आहे. त्याने अक्षयचा आगामी सिनेमा  ‘सूर्यवंशी'(sooryavanshi) बद्दल ट्विट करत नाराजी व्यक्त आहे. मात्र केआरकेच्या या ट्विटची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगत आहे तसेच लक्षवेधी ठरत आहे.(akshay kumar sooryavanshi made in 300 crores got only 50 crores offer on ott)

नेमकं काय म्हणाला केआरके-

अक्षय कुमारचा आगामी बहुचर्चीत सिनेमा ‘सूर्यवंशी’ ज्याची चाहते देखील आतुरतेने वाट पाहत आहेत या सिनेमाबाबत ट्विट करत केआरके म्हणाला. “माझ्या सूत्रानुसार आता ओटीटी प्लॅटफॉर्मने सूर्यवंशी सिनेमासाठी अक्षयला केवळ 50 कोटींची ऑफर दिली आहे. अक्षयचे मागील काही सिनेमे फॉल्प ठरल्यामुळे ओटीटी प्लॅटफॉर्मने हा निर्णय घेतला आहे. पण सूर्यवंशी सिनेमाचा बजेट तब्बल 300 कोटी असून हा बीग बजेट सिनेमा रिलीज होण्याचे सगळे मार्ग बंद झाले आहेत ही खूप निराशाजनक बाब आहे.”

- Advertisement -

According to my sources, now #OTT is offering only ₹50Cr for #Sooryavanshi. This is the result of last 2 disaster films of Akki. While budget of #Sooryavanshi is approx ₹300Cr! Means all the possible ways have been closed for the release of this film now. Sad thing!

— KRK (@kamaalrkhan) August 23, 2021

- Advertisement -

केआरकेने केलेला दावा कितपत खरा आहे याबात अद्याप कोणतीही अधीकृत माहिती समोर आली नाहीये. कोरोना व्हायरसमुळे या सिनेमाची रिलीज डेट कॅन्सल करण्यात आली होती. यामुळे अनेक बिग बजेट सिनेमाच्या मेकर्सने कोरोना काळत सिनेमा ओटीटीवर रिलीज करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ओटीटीवर सिनेमा रिलीज होत असल्याने चाहत्यामंध्ये थेटरमध्ये सिनेमा पाहण्याची जी उत्सुकता आहे आवड आहे हे फारश्या प्रमाणात दिसून येत नाहीये. यामुळे अक्षयचे अनेक सिनेमा ओटीटीवर रिलज होऊन देखील काही खास कमाल करु शकले नाही. आता ‘सूर्यवंशी’ कितपत चाहत्यांना भुरळ घालण्यात यशस्वी ठरतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


हे हि वाचा – KRKला ट्विट करणे पडले महागात, मनोज वाजपेयीने ठोकला मानहानीचा दावा

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -