झोमॅटो बॉय आणि सुरक्षा रक्षकाचा पेहराव करून पकडले सोनसाखळी चोर

झोमॅटो बॉय आणि सुरक्षा रक्षकाचा पेहराव करून पकडले सोनसाखळी चोर

मुंबईसह उपनगरात मॉर्निग वॉकसाठी घरातून बाहेर पडणाऱ्या वृद्ध इसम आणि महिलांना लक्ष करून त्याच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून पळणाऱ्या सोनसाखळी चोराला विनोबा भावे नगर पोलीसानी एकाला अटक केली आहे. या सोनसाखळी चोराला अटक करण्यातसाठी पोलिसांना झोमॅटो बॉय आणि सुरक्षा रक्षक बनून या चोरट्यांवर पाळत ठेवून त्याचा माग काढत हि कारवाई घाटकोपर पश्चिम येथे केली आहे. फैजल अली युसूफ अली शेख ईराणी (२८) असे अटक करण्यात आलेल्या एका सोनसाखळी चोरांचे नाव असून त्याचा दुसरा साथीदाराला येथील महिलानी पोलिसांवर हल्ला करून पळवून लावले आहे.

फैजल आणि त्याच्या साथीदारावर मुंबई, ठाण्यात सुमारे १५ पेक्षा अधिक सोनसाखळीचे गुन्हे दाखल आहेत. मागील काही महिन्यापासून या दोघांनी मुंबईसह उपनगरात पहाटेच्या सुमारास मॉर्निग वॉकसाठी घरातून बाहेर पडणाऱ्या महिला, जेष्ठ नागरिक यांना लक्ष केले होते, मोटारसायकलवरून येऊन मैल आणि जेष्ठ नागरिकाच्या गळ्यातील सोनसाखळ्या चोरी करून धुमाकूळ घातला होता. कुर्ला पश्चिम येथील कमानी येथून सुनंदा गुटेकर हि महिला रस्ता ओलांडत असताना दुचाकीवर आलेल्या दोघांनी गुटेकर यांच्या गळ्यातील १० ग्राम वजनाची सोनसाखळी खेचून पोबारा केला होता.

तत्पूर्वी हे दोघे साकीनाकाच्या हद्दीतून सोनसाखळी चोरी करून कुर्ला पश्चिम कमानी येथून घाटकोपरच्या दिशेने पोबारा केला होता. विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या सोनसाखळी चोराला अटक करण्यातसाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पवार यांनी पोलीस उपनिरीक्षक पद्माकर पाटील, पोलीस अंमलदार गवारे, निळे, गोविंद देवळे, केसरकर, नरबट या पथकाची नेमणूक केली. या पथकाने कमानी जंक्शन पासून घाटकोपर परिसरातील सुमारे ४० सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात हे दोघे मोटारसायकलवरून विद्याविहारच्या दिशेने गेल्याचे दिसून आले. त्यानंतर तेथे त्यांनी मोटारसायकल पार्क करून काही अंतर चालत जाऊन रिक्षाने एलबीएस मार्ग हॉटेल नाझ या ठिकाणी आले तेथून त्यांनी एक स्कुटर घेऊन पुन्हा घाटकोपरच्या दिशेने गेल्याचे दिसून आले.

तपास पथकाने या फुटेजवरून सर्वात प्रथम मोटरसायकलचा शोध घेतला असता ती मोटारसायकल विद्याविहारच्या दिशेने पार्क करण्यात आली असल्याचे दिसून आले. हि मोटारसायकल घेण्यासाठी चोरटे येणार हि खात्री होताच पोलीसानी जवळच असणाऱ्या एका एटीएम सेंटर येथे सुरक्षा गार्ड बनून गादीवर लक्ष ठेवले तर पथकातील इतर अंमलदार हे झोमॅटो बॉय बनून स्कुटरच्या दिशेने गेली त्याचा शोध घेऊन घाटकोपर पश्चिम येथील पंकेशा दर्गा या ठिकाणी असलेल्या वस्तीत उभी असलेली मिळून आली. पोलिसांनी या दोन्ही गाड्याची माहिती काढली असता स्कुटर हि आंबिवली येथील एका इराणी नागरिकांच्या नावावर असल्याची माहिती मिळाली. तर दुसरी वाहने हे चोरीचे असल्याचे समोर आले.

पोलिसांनी पंकेशा दर्गा या ठिकाणी आरोपीचा शोध घेण्यासाठी गेले असता फैजल आणि त्याचा साथीदार एका मोकळ्या जागेत बसले असल्याचे दिसून आले. पोलिसांनी या दोघांवर झडप टाकून दोघांना ताब्यात घेतले असता या दोघांनी आरडाओरड करताच काही महिला त्या ठिकाणी गोळा झाल्या आणि त्यांनी पोलिसांवर हल्ला करून आरोपीना पळून जाण्यासाठी मदत करू लागले. महिलांना रोखण्यासाठी पोलिसांनी स्थानिक पोलीसाची मदत मातीतली असता पार्कसाईड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या गोंधळात एक आरोपी पळून गेला असून पोलिसांनी फैजल याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. याप्रकरणी फैजल याला अटक करण्यात आली आहे. फैजल आणि त्याच्या सहकार्यावर मुंबई ठाण्यात १५ पेक्षा अधिक सोनसाखळीची गुन्हे दाखल असून ठाणे पोलिसांनी या दोघांना मोक्का लावला होता. मोक्कातुन बाहेर पडल्यानंतर या दोघांनी मुंबईत गुन्हे करण्यास सुरुवात केली होती अशी माहिती वपोनि. राजेश पवार यांनी दिली.


हेही वाचा – टिटवाळ्यात बंदूकीचा धाक दाखवून दोघांचे अपहरण, २५ लाखांच्या खंडणीची मागणी

First Published on: December 29, 2021 8:13 PM
Exit mobile version