Navi Mumbai : तळोजातील पंचमहाल डेअरीकडून सुरक्षा वाऱ्यावर ; स्थानिकांचा जीव धोक्यात

Navi Mumbai : तळोजातील पंचमहाल डेअरीकडून सुरक्षा वाऱ्यावर ; स्थानिकांचा जीव धोक्यात

दूध उद्योगातील बलाढ्य ‘अमूल’च्या अधिपत्त्यातील पंचमहाल (पंचामृत) दूध डेअरीचा नवी मुंबईतील प्रकल्प वादात सापडला आहे. डेअरीतील बायो-मिथानेशन प्लांटच्या उभारणीत फॅक्टरी अॅक्ट आणि फायर अँड सेफ्टी ऑडिटच्या नियमांचे उघडपणे उल्लंघन केले आहे. मिथेन हा अत्यंत घातक आणि तीव्र ज्वलनशील वायू आहे. तरीही नियम धाब्यावर बसवून अत्यंत बेफिकिरीपणे या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांच्या जिविताला धोका उद्भवू शकतो असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.

पंचामृत डेअरीच्या उभारणीच्या कामात मोठ्या प्रमाणावर अनियमितता, नियम आणि कायद्यांचे उल्लंघन झाले आहे. डेअरीमध्ये निर्माण होणाऱ्या सांडपाण्याला मोठी दुर्गंधी येते. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांनुसार प्रक्रिया केल्याशिवाय सांडपाणी नाल्यात सोडता येत नाही. त्यासाठी डेअरीत बायो-मिथानेशन प्लांट उभारण्यात आला आहे. दररोज दोन लाख लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया करता येईल इतका मोठा हा प्रकल्प आहे.

प्रकल्पाअंतर्गत बायो-मिथानेशन रिअॅक्टर, मिथेन गॅस होल्डिंग टँक, गॅस कॉम्प्रेशन युनिट आणि मिथेन गॅस जाळून टाकणारी चिमणी बसवण्यात आली आहे. डेअरीच्या सांडपाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर यात तयार होणारा मिथेन वायू चिमणीद्वारे (फ्लेअर स्टॅक) जाळून टाकला जातो. तर प्रक्रियायुक्त सांडपाणी पुढे नाल्यात सोडले जाते.

प्लांटच्या बाजूला मोकळी जागा आवश्यक

नियमाप्रमाणे प्लांटच्या आजूबाजूला सहा मीटर आणि कॉर्नरच्याठिकाणी नऊ मीटर मोकळी जागा आवश्यक आहे. अपघातप्रसंगी अग्निशमन दलाच्या गाडीला आत येता यावे हा हेतू त्यामागे आहे. इथे हा प्लांट कंम्पाऊंडच्या भिंतीपासून अवघ्या एक मीटरच्या अंतरावर उभा आहे. मिथेन गॅस होल्डिंग टँक आरसीसी आहे. या आरसीसीला तडे गेले तर वायू गळती होते.


हेही वाचा – महाराजांच्या इतिहासाचे हिरवेकरण करण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न, चंद्रकांत पाटलांचा आरोप


 

First Published on: January 18, 2022 9:05 PM
Exit mobile version