पेणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत

पेणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत

पेणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत

शहरात पावसाळ्याच्या दरम्यान स्वच्छतेचे तीन तेरा वाजलेले दिसून येत असून, कचर्‍याचे ढीग वाढत असल्याने यावर अन्य जनावरांसह भटकी कुत्री मुक्तपणे वावरताना दिसून येत आहे. सध्या भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे निर्माण होत आहे.

गेल्या काही वर्षांत भटकी कुत्री ही या शहराची डोकेदुखी बनली आहे. येणार्‍या-जाणार्‍यांच्या अंगावर भुंकणे हे दृश्य सर्वांच्याच परिचयाचे झाले असून, अनेकदा एखादे कुत्रे चावाही घेते. वाहनचालकांच्या पाठी ही भटकी कुत्री लागत असल्याने दुचाकीस्वर तर सुसाट गाडी हाकतात. मात्र यात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भटकी कुत्री चावल्याने रेबीजसारखा घातक रोग होण्याची शक्यता असते. उघड्यावर फिरणार्‍या भटक्या कुत्र्यांनी नागरिकांना चावा घेतल्याच्या यापूर्वी अनेक घटना घडल्याने रात्री जाताना अनेकांची पाचावर धारण बसते. कामावरून उशिरा येणार्‍यांना तर या भटक्या कुत्र्यांच्या त्रासाला रोजचेच सामोरे जावे लागत आहे. विठ्ठल आळी, खाटिक आळी, टेमघरे आळी, झिराळ आळी, देव आळी, मेहतर कॉलनी, नवीन वसाहत आदी भागात भटक्या कुत्र्यांची झुंड नेहमीच दिसून येते.

नगर पालिकेने या भटक्या कुत्र्यांचा सत्वर बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत. दरम्यान, शहरात नियमित स्वच्छता केली जात असून, ३०० हून अधिक कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.


हेही वाचा – Maharashtra Lockdown 2021: … तर महाराष्ट्रात पुन्हा कडक लॉकडाऊन – राजेश टोपे

First Published on: August 11, 2021 9:43 PM
Exit mobile version