Thane: पावती निवास इमारतीला आग, दाम्पत्यांना बाहेर काढण्यात यश

Thane: पावती निवास इमारतीला आग, दाम्पत्यांना बाहेर काढण्यात यश

नौपाडा परिसरातील पावती निवास या तळ अधिक दोन असलेल्या इमारतीच्या मागे लागलेल्या आगीची झळ त्या इमारतीला बसली. यावेळी त्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या रवी टकले (८४) आणि कुंदन (७८) या वयोवृद्ध दाम्पत्याला टीडीआरएफच्या जवानांने तातडीने धाव घेत,त्या वृद्ध दाम्पत्यास सुखरूप बाहेर काढल्याची घटना सोमवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली.

पावती निवास या इमारतीला आग लागली त्यावेळी टीडीआरएफचा जवान असलेले सुमित परदेशी आणि त्याचा मित्र कुंदन पाटील हे दोघे तेथे काही कामानिमित्त आले होते. त्यांनी आग लागल्याचे लक्षात येताच आणि इमारतीमध्ये वृद्ध दाम्पत्य निदर्शनास आल्यावर त्याने अग्निशमन दलाची वाट न पाहता, तातडीने स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचाव कार्य हाती घेतले.

त्या दाम्पत्यांना सुखरूप बाहेर काढल्यानंतर अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी दाखल झाले. त्यांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळविण्यास सुरू केली. आगीचे कारण समजू शकले नाही.


हेही वाचा – भिवंडीतील प्रेरणा कॉम्प्लेक्समधील गोदामाला भीषण आग, १० गोदामं जळून खाक

First Published on: December 20, 2021 10:19 PM
Exit mobile version