घरठाणेभिवंडीतील प्रेरणा कॉम्प्लेक्समधील गोदामाला भीषण आग, १० गोदामं जळून खाक

भिवंडीतील प्रेरणा कॉम्प्लेक्समधील गोदामाला भीषण आग, १० गोदामं जळून खाक

Subscribe

भिवंडीतील आज पुन्हा एकदा आगीची घटना समोर आली आहे. भिवंडीच्या वळ ग्रामपंचायत हद्दीतील गोदाम संकुलात ही आगीची घटना घडली आहे. प्रेरणा कॉम्प्लेक्स असे या गोदाम संकुलाचे नाव आहे. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या सध्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र आग भीषण असल्याने आगीचा काळा धूर दूरवर पसरत आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

मात्र या कॉम्प्लेक्समधील जवळपास १० गोदामं जळून खाक झाल्याचे म्हटले जात आहे. परंतु या आगीचे नेमकं कारण स्पष्ट झालेले नाही. सध्या अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -