Diwali decoration : दिवाळी सणातील सजावट ; साहित्याला महागाईची झळाळी

Diwali decoration : दिवाळी सणातील सजावट ; साहित्याला महागाईची झळाळी

Diwali decoration : दिवाळी सणातील सजावट ; साहित्याला महागाईची झळाली

सणांचा राजा असलेल्या दिवाळीच्या तयारीसाठी सार्‍यांची लगबग सुरू झाली आहे. विविध वस्तू खरेदीसाठी बाजारात ग्राहकांची गर्दी होऊ लागली आहे. सणानिमित्त आकाश कंदील, पणत्यांची दुकाने जागोजागी थाटली आहेत. हे आकर्षक आकाश कंदील लक्ष वेधून घेत असून यंदा आकाश कंदिलांचे पारंपरिक आणि काही नवे प्रकार वडखळ, पेण बाजारात उपलब्ध झाले आहेत. त्यात यंदाही दिवाळीच्या सजावट साहित्याच्या किंमतीत १० ते १५ टक्के वाढ झाली आहे.

हा सण अधिक खुलतो पणत्या आणि मातीच्या दिव्यांमुळे. देवघरापासून ते अंगणापर्यंत सर्व परिसरात पणत्या लावण्याची प्रथा आहे. शहरातील विविध बाजारात जागोजागी असे विविध प्रकारचे आकर्षक दिवे विक्रीस दिसून येतात. यामध्ये पाच पणती, डबल प्लेट पणती, कोलकाता पणती, कासव, मासा पणती, चायना मेड पणती अशा वेगवेगळ्या कलाकुसर केलेल्या पणत्या विक्रीस बाजारात आल्या आहेत. साध्या पणत्या २० रुपये, तर आकर्षक पणत्या १५० रुपयांपर्यंत उपलब्ध असल्याचे विक्रेते राजेद्र कुमार यांनी सांगितले. कासव, तसेच मासा पणती, कंदिल लाईटची किंमत प्रत्येकी १००रुपयांच्या घरात आहे. गाय वासरूची मूर्ती १२० रुपयाला तर रेडिमेड किल्लेही विक्रीस आले असून, सोबतीला लहान आकाराच्या सैनिकांच्या मूर्तीही आहेत.

दिवाळीनिमित्त घर सुशोभित करण्यासाठी विविध आकर्षक स्टीकर बाजारात आले आहेत. यात शुभलाभ, स्वतिक, पाऊले, श्री आणि इतर सजावट साहित्यांचा समावेश आहे. यात कागदी, प्लास्टिक, पीव्हीसी, मेटॅलिक, अ‍ॅक्रॅलिक अशा अनेक प्रकारात दाखल झाले आहेत. याशिवाय रांगोळीचे लहान-मोठ्या आकारातील स्टीकर बाजारात आले आहेत. यासह मोती तसेच फुलांची तोरणे, टिकाऊ फुलांची माळ, आकर्षक मेणाचे विविध प्रकारचे दिवे, लायटिंग पणत्यांनी दुकाने सजली असल्याने ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे. रंगीबेरंगी कापडी, हॉलोग्राफी, मार्बल पेपर यासह फोल्डिंगचे असंख्य प्रकारचे आकर्षक आकाश कंदील विक्रीसाठी बाजारात दाखल झाले आहेत. ५० रुपयांपासून आकाशदिवे उपलब्ध असून ग्राहकांचा कंदिल खरेदीला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. चांदणी, पेशवाई, टोमॅटो बॉल, पॅराशूट यांसह इको फ्रेंडली हॅण्डमेड आकाश कंदील यंदा बाजारात आहेत. कासव, मासा पणती, कंदिल लाईटसह आकर्षक डिझाईनच्या पणत्यांना चांगली मागणी वाढली आहे.

दिवाळी सजावट            वस्तू सध्याचे दर            गेल्या वर्षीचे दर

 

वार्ताहर – प्रदीप मोकल


हे ही वाचा – मुंबईचा कुंभारवाडा सजला पारंपरिक पणत्यांनी


 

First Published on: October 28, 2021 9:50 PM
Exit mobile version