डोंबिवलीत कोरोनाचा कहर! रुग्णालयात दाखल करून घेण्यासाठी बाधितांच्या लांबच लांब रांगा

डोंबिवलीत कोरोनाचा कहर! रुग्णालयात दाखल करून घेण्यासाठी बाधितांच्या लांबच लांब रांगा

राज्यात कोरोना रुग्णाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. डोंबिवली मध्ये कोरोना रुग्ण आढळण्याचे प्रमाण जास्त आहे. डोंबिवलीत दररोज ४५० ते ५०० कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची आरोग्य सेवा अपूरी पडू लागली आहे. डोंबिवली पूर्व भागातील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलसमोर Admit करून घेण्यासाठी कोरोनाबाधित रुग्णांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांचे हाल सुरू असून रुग्णांचे नातेवाईक संतापले आहेत.

काही दिवसांपूर्वी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांनी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी रात्रीची संचारबंदी लागू केली होती. त्यावेळी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त विजय सुर्यवंशी यांनी रुग्णांसाठी बेड्स आणि आरोग्य सेवा सज्ज असल्याचे सांगितले होते. परंतु शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर उपचारासाठी दाखल कराव्या लागणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

डोंबिवलीच्या पूर्व भागात असणाऱ्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र त्या तुलनेत पालिकेची कोविड केअर सेंटर फारच कमी पडू लागली आहेत. पलिकेच्या अशा सुविधामुळे रुग्णांच्या नातेवाईकांचा संताप शिगेला जाऊन हॉस्पिटल व्यवस्थापन आणि रुग्णांसह रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये खटके उडू लागले आहेत. त्यामुळे आता तरी पालिका यासाठी कोविड केअर सेंटरची संख्या वाढवेल का हा प्रश्न उपस्थित होत आहे. पालिकेच्या या अपुऱ्या सुविंधामुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे.


हेही वाचा – Corona Update: राज्यात पुरेशा बेड्सी उपलब्धता – राजेश टोपे


 

First Published on: March 31, 2021 2:30 PM
Exit mobile version